हिंगोली (Hingoli):- येथे सहकार भारती हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहिर करण्यात आली असून हिंगोली जिल्हाध्यक्षपदी ओमप्रकाश देवडा पिपल्स को-ऑप. बँक लि. हिंगोलीचे अध्यक्ष श्री. प्रकाशचंदजी सोनी व महामंत्रीपदी संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनीलकुमार सिन्हा यांची निवड(selection) करण्यात आली आहे.
सहकार भारती हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहिर
हिंगोली येथील देव पॅलेसच्या सभागृहामध्ये दि. 09/11/2024 रोजी सहकार भारती हिंगोली जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन प्रमुख श्री. शरदजी जाधव, प्रदेश सहसंघटन प्रमुख श्री. विजयरावजी देशमुख, प्रदेश सचिव सुनीलजी मोतलग, प्रदेश पतसंस्था सहप्रकोष्ट प्रमुख श्री. जनकराजजी खुराणा, सुंदरलाल सावजी बँकेचे माजी संचालक श्री. नरेंद्रजी दोडल, ओमप्रकाश देवडा पिपल्स बँकेचे अध्यक्ष श्री. प्रकाशचंदजी सोनी, ओमप्रकाश देवडा पिपल्स बँकेचे उपाध्यक्ष श्री. सुनीलजी देवडा, वैजनाथअप्पा सराफ नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. सुरेशआप्पा सराफ यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी श्री. शरदजी जाधव, श्री. विजयरावजी देशमुख, सुनीलजी मोतलग, श्री. सुनीलजी देवडा, श्री. प्रकाशचंदजी सोनी यांनी सहकार भारती संदर्भात मार्गदर्शन केले.
हिंगोली जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहिर
यावेळी श्री. सुनीलजी मोतलग यांनी सहकार भारती हिंगोली जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहिर केली. यामध्ये हिंगोली जिल्हाध्यक्षपदी श्री. प्रकाशचंदजी सोनी, महामंत्री श्री. सुनीलकुमार सिन्हा, उपाध्यक्षपदी श्री. राजूभैय्या जैस्वाल, श्री. प्रदीपजी गंभीरे, श्री. सतीशजी सोमाणी, श्री. गजेंद्रजी बियाणी व श्री. प्रणव पवार, संघटनप्रमुख श्री. निलेश लाखकर, सहसंघटन प्रमुख श्री. विलासराव काळे, श्री. डॉ. लक्ष्मण पठाडे, श्री. अमितजी रुहाटिया, इंडस्ट्रियल को-ऑप- सोसायटी प्रकोष्ट प्रमुख श्री. सावरमलजी झुणझुणवाला यांची निवड करण्यात आली. तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून श्री. नरेंद्रजी दोडल, श्री. सुनीलजी देवडा, श्री. सुरेशजी सराफ, श्री. ॲड. सतीशजी देशमुख, श्री. गोपालजी अग्रवाल, श्री. शिवदासजी बोड्डेवार आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. श्री. सुरेंद्रजी साहू, श्री. किशोर नायसे, श्री. कडूजी कोरडे, श्री. नितीन कापसे, श्री. गजानन ढोणे, श्री. विक्की गोरे, श्री. रवि सोवितकर, श्री. लक्ष्मण बरडे, श्री. उल्हास दिवाळकर यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन श्री. निलेश लाखकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शंकरराव कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.