आरोग्य तज्ञांच्या मते एसीमुळे होऊ शकतो गंभीर व जीवघेणा आजार.!
साहूर (Sahoor) : आज प्रत्येक गोष्ट व प्रत्येक वस्तू ही एक फॅशन व स्टैंडर्ड मेंटनस म्हणून वापरल्या जाते. अलीकडे अनेक नागरिक कुलर पंखे असताना एक स्टैंडर्ड मेंटनस म्हणून किंवा फॅशन म्हणून एसीचा वापर करतात. परंतु आरोग्य तज्ञांच्या मते एसीच्या हवेत श्वास घेणे आरोग्यासाठी (Health) खूप धोकादायक ठरू शकते. एसीमुळे गंभीर व जीवघेणा आजार (Illness) सुद्धा होऊ शकतो. म्हणूनच आजारापासून वाचायचे असेल तर एसीचा अजिबात वापर करू नका किंवा त्याला मर्यादित वापरा, असे आरोग्य तज्ञ सांगतात. आरोग्य तज्ञांच्या मते ज्या एअर कंडिशनरला (Air Conditioner) तुम्ही एक फॅशन व स्टँडर्ड मेंटनस म्हणून वापरता, त्यामुळे तुमच्या आरोग्यालाच नव्हे तर त्वचेलाही हानी पोहोचू शकते.
सतत एसी मध्ये बसल्याने होऊ शकते डिहायड्रेशन.!
जरी एसी घर थंड ठेवत असले तरी घर थंड ठेवण्यासाठी एसी ऐवजी नैसर्गिक पद्धतीचा वापर करावा. एसीचे दुष्परिणाम (AC Side Effects) जाणून घेतल्यानंतर तुम्ही त्यांचा वापर आपोआप कमी कराल. एसीमुळे अस्थमासारखा गंभीर आणि जीवघेणा आजार होण्याची दाट शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढू शकते असे आरोग्य तज्ञ सांगतात. जर तुम्ही दम्याचे बळी असाल तर तुम्ही एसी मध्ये चुकूनही जास्त वेळ बसू नये आरोग्य तज्ञांच्या (Health Specialist) मते सतत एसी मध्ये जास्त वेळ बसण्यानेही डिहायड्रेशन (Dehydration) होऊ शकते आणि उन्हाळ्यात समस्येपासून स्वतःला वाचवणे खूप गरजेचे आहे.
एसीची हवा तुमच्या त्वचेला खराब करू शकते..!
आरोग्य तज्ञांच्या मते आश्चर्याची बाब म्हणजे एलर्जीक राहिनाइटिसचे (Allergic Rhinitis) मुख्य कारण एसी मध्ये जास्त वेळ घालवणे हे देखील असू शकते म्हणूनच एसी मध्ये जास्त वेळ बसणे टाळावे. एअर कंडिशनर मध्ये जास्त वेळ बसल्याने संसर्गाचा (Infection) धोका सुद्धा वाढू शकतो. एसीमुळे तुम्हाला चक्कर येणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्यांना सुद्धा सामोरे जावे लागू शकते. एसीची हवा तुमच्या त्वचेचे आरोग्य खराब करू शकते. खरे तर एअर कंडिशनर मध्ये जास्त वेळ बसल्याने त्वचा कोरडी (Dry Skin) होऊ शकते. अशा समस्या टाळण्यासाठी एसी ऐवजी इंडोर आउटडोर प्लांट्स (Indoor Outdoor Plants) आणि खसखसचे पडदे वापरावेत यामुळे तुमच्या खोलीत आणि घराला नैसर्गिक थंडावा मिळेल.