मुंबई (Saif Ali Khan Helth update) : बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) जखमी अवस्थेत मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे. काल रात्री वांद्रे येथील त्यांच्या घरात एका चोराने घुसून त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. चोराने सैफवर सहा वेळा हल्ला केला, त्यानंतर त्याला रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) प्राणघातक हल्ल्याची बातमी ऐकून त्याचे चाहते खूप दुःखी झाले आहेत आणि ते अभिनेत्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. यासोबतच, सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, सैफ अलीची सध्या कशी प्रकृती आहे? याबद्दल, (Kareena Kapoor) करीना कपूरच्या कुटुंबातील एका जवळच्या नेत्याने सैफ अलीच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
#WATCH | Over attack on Actor Saif Ali Khan,
Dixit Gedam, DCP Zone 9, Mumbai Police says, "Last night, "The accused used a fire escape staircase to enter Saif Ali Khan's house. It appears to be a robbery attempt. We working to arrest the accused. 10 Detection teams are working… pic.twitter.com/g6oLZH9w7f
— ANI (@ANI) January 16, 2025
शरद पवार यांची मुलगी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) ही करिना कपूरची जवळची मैत्रीण आहे. ज्यांचे सैफ अली खानची (Saif Ali Khan) अभिनेत्री पत्नी करीना कपूर खानशी (Kareena Kapoor) जवळचे कौटुंबिक संबंध आहेत. सुप्रिया सुळे ही करिना कपूरची मावशी रिमा जैन हिची जवळची मैत्रीण आहे, जी राज कपूरची मुलगी देखील आहे. सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खानच्या प्रकृतीबद्दल नवीनतम अपडेट दिली आहे.
सुप्रिया सुळे यानी सांगितली सैफची प्रकृती?
राष्ट्रवादी-सपा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, (Saif Ali Khan) सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यांनी आश्वासन दिले की, सैफ अली आता धोक्याबाहेर आहे, तो पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
VIDEO | Attack on Saif Ali Khan: CCTV footage shows the alleged attacker fleeing the building through staircase.
(Source: Third Party)#SaifAliKhanInjured pic.twitter.com/VHpAenxFdu
— Press Trust of India (@PTI_News) January 16, 2025
सुप्रिया सुळे यांनी केला हा खुलासा
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खुलासा केला की, त्यांनी करीना कपूरची बहीण करिश्माशी फोनवर बोलले आणि तिने त्यांना सांगितले की, (Saif Ali Khan) सैफ रुग्णालयात उपचार घेत आहे. करीना कपूरची (Kareena Kapoor) प्रकृती सुधारल्यानंतर ती घरी परतली आहे. सुप्रिया सुळे यांनी सैफची प्रकृती स्थिर असून रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची खात्री दिली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सांगितले की, करीना कपूर (Kareena Kapoor) आणि तिची दोन्ही मुले पूर्णपणे सुरक्षित आणि निरोगी आहेत. त्यांनी लोकांना अटकळ टाळण्याचा सल्ला दिला. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत आणि आरोपी लवकरच पकडले जातील.