सकल मराठा समाजाचे निवेदन
परभणी (Sakal Maratha Samaj) : बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुना संदर्भात सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शुक्रवार १३ डिसेंबर रोजी या बाबत निवेदन सादर करण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर परभणी जिल्ह्यातील सर्व (Sakal Maratha Samaj) समाज बांधव चलो बीडचा नारा देतील. होणार्या सर्व परिणामांना शासन जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिलेल्या निवेदनावर हभप. पुरुषोत्तम महाराज झाडगावकर, हभप. बालासाहेब मोहिते, किशोर रणेर, वैâलास पवार, आकाश कदम, सतीश पाटील, रमेश देशमुख, नामदेव चापके, कृष्णा येवले, सुनील बागल, संतोष देशमुख, लक्ष्मण मोहिते, शंकर नाईकनवरे, सतीश जाधव, अर्जून भोगावकर, महेश शेळके आदींच्या स्वाक्षर्या आहेत. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेचे राज्यभरात पडसाद उमटत असलयाचे दिसत आहे. परभणीतही (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.