सकल मराठा समाजाच्या बैठकीत विविध ठराव
हिंगोली (Sakal Maratha Samaj) : सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत नांदेड येथील (Hingoli Police) पोलीस महासंचालकाना असोला ( ढोबळे) गोळीबार प्रकरणी कारवाईसाठी शिष्टमंडळ भेटणार असल्याचा निर्णय झाला. याचबरोबर बैठकीत विविध ठराव सर्व समितीने पारित करण्यात आले.
हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाज जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत औंढा नागनाथ तालुक्यातील असोला (ढोबळे) येथील गोळीबार प्रकरणी (Hingoli Police) पोलिसांनी केलेली कारवाई या संदर्भात माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री व पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे गोळीबार प्रकरणातील मागण्याची पूर्तता अद्याप झाली नाही. यामुळे मराठा बांधवात तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली.
तत्कालीन एपीआय बोराटे व जमादार सांगळे यांचा चौकशी अहवाल तातडीने दाखल करून त्वरित निलंबित करण्यात यावे, जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणे, गोळीबारात जखमी मारुती पावडे यांना शासनाने ५० लक्ष रुपयाची आर्थिक मदत यासह इतर मागण्या पूर्तता झाली नसल्याची खंत बैठकीत उपस्थित (Sakal Maratha Samaj) मराठा बांधवांनी व्यक्त केली. नांदेड येथील पोलीस महानिरीक्षकांना येत्या दि. १६ ऑगस्ट रोजी शिष्टमंडळासह आंदोलनाचे निवेदन देण्याचे सर्वानुमते ठरले. मागण्याची पूर्तता न झाल्यास सात दिवसानंतर जिल्ह्यातील प्रत्येक (Hingoli Police) पोलीस ठाण्याच्या समोर संविधानिक पद्धतीने भजन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने कळमनुरी विधानसभा मतदारसंघात गाव पातळीवर संपर्क अभियान राबविण्याचा कृती कार्यक्रम हाती घेण्याची नियोजन करण्यात आले. ओबीसीतून मराठा आरक्षण बलिदान दिलेल्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे तसेच गुंडा ता. वसमत येथील एकनाथ चव्हाण व गोळीबारात जखमी मारुती पावडे यांच्या कुटुंबियांना तातडीची मदतीचा हात देण्यात येणार आहे, यासाठी एक स्वतंत्र समिती नियुक्त करून बाळासाहेब बोंगाणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. बैठकीत विविध विषयावर चर्चा करून सर्व समितीने निर्णय घेण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील (Sakal Maratha Samaj) मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.