भीषण कार अपघात; दोन ठार, एक जखमी
साकोली/सानगडी (Sakoli Accident) : साकोली येथील उड्डाणपुलावर सायंकाळी ५ वाजतादरम्यान झालेल्या (Terrible car accident) भीषण कार अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला. तर १४ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला. कारच्या काचेवर पाणी उडाल्याने कारचालक डॉक्टरचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सुसाट कार रस्ता दुभाजकावर आदळली. त्यात डॉक्टर मुलासह आईचा मृत्यू झाला. मृतक हे नागपूर येथे नातेवाईकांकडे असलेल्या लग्न कार्यक्रमाला जात असतांना अपघात घडला. डॉक्टर सुफल गजभिये व आई कांता गजभिये, असे मृतकांचे नाव असून शिवम गजभिये, असे जखमी मुलाचे नाव आहे. (Sakoli Accident) जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.
कारच्या काचेवर पाणी उडाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले
रायपूर येथील डॉक्टर सुफल गजभिये याच्या बहिणीच्या घरी नागपूर येथे विवाह कार्यक्रम असल्याने दि.२९ जून रोजी मुलगा सुफल गजभिये, आई कांता गजभिये व १४ वर्षीय मुलगा शिवम गजभिये हे तिघेही जण कार क्र.सीजी ०४ एचजे ४४८४ या कारने निघाले. साकोली उड्डाणपुलावर बोदरा फाट्याजवळ महामार्गावरील खड्ड्यात साचलेले पाणी कारच्या समोरील काचावर उडाले. यामुळे कारचालक डॉ.सुफल गजभिये याचे कारवरील नियंत्रण सुटले. (Sakoli Accident) क्षणात अनियंत्रित कार रस्ता दुभाजकावर आदळून उलटली. त्यात कांता गजभिये यांचे जागीच मृत्यू झाला.
१४ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला
अपघात घडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी डॉ.सुफल गजभिये व मुलगा शिवम याला तत्काळ जवळच्याच उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ.सुफल गजभिये याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी शिवम याचेवर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. (Sakoli Accident) अपघाताची माहिती साकोली पोलीसांना मिळताच ठाणेदार रमाकांत कोकाटे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनाकरीता पाठविले. पुढील तपास (Sakoli Police) साकोली पोलीस करीत आहेत.