साकोली-सानगडी मार्गावरील तीन दिवसातील दुसरी घटना
साकोली (Sakoli Accident) : चंद्रपूर येथून प्रवासी घेऊन साकोलीकरीता निघालेल्या (ST Bus Accident) एसटी बसला दि. ११ जून रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान साकोली जवळील कुंभली येथे अपघात झाला. ओव्हरटेक करणार्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित बस एका घरावर आदळली. त्यात एसटी बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मार्गावर तीन दिवसातील दुसरी (Sakoli Accident) घटना असल्याने प्रवास्यांचा जीव टांगणीला आला असून प्रवास्यांत एसटी प्रवासाबाबत असुरक्षितता निर्माण झाली आहे.
चंद्रपूर-साकोली बसला कुंभली येथे अपघात
जखमींमध्ये उमराव मेश्राम रा. सोनमारा, सत्यशिला कांबळे रा. बोरगाव, सुरज साखरे रा. बोदरा, श्रद्धानंद शनिचर रा. तुमसर, साक्षी रणदिवे रा.बोरटोला, किर्ती रणदिवे रा.बोरटोला, अशी जखमींची नावे आहेत. साकोली आगाराची एसटी बस क्र.एमएच ४० एक्यू ६०८२ ही प्रवासी घेऊन चंद्रपूर येथून साकोलीकरीता निघाली. दुपारी ४ वाजतादरम्यान साकोली जवळील (Sakoli Accident) साकोली-सानगडी मार्गावरील कुंभली येथे एका ओव्हरटेक करणार्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालक नरेश मौजे याचे एसटीबसवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित बस कुंभली येथील मार्तंड खोटेले यांचे घरावर आदळली. त्यात दुकानाचे शटर व इतर साहित्यांचे नुकसान झाले. तर (ST Bus Accident) एसटी बस मधील सहा प्रवासी जखमी झाले.
प्रवास्यांचा जीव टांगणीला
जखमींना उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालयात (Bhandara Hospital) नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सदानंद शनिचर व सत्यशिला कांबळे या जखमींना भंडार्याला हलविण्यात आले. अपघाताची माहिती आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णाालयात (Bhandara Hospital) जाऊन जखमींची विचारपूस करुन चौकशी केली. तसेच त्यांना आर्थिक मदत दिली. अपघात घडला त्यावेळी एसटीमध्ये तीस-चाळीस प्रवासी प्रवास करीत असल्याचे सांगितले जाते. मात्र एसटी अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रवास्यांत भिती व्यक्त केली जात आहे. याकडे राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देऊन अपघात टाळण्याच्या दृष्टिने काही उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तीन दिवसातील दुसरी घटना
एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, या राज्यपरिवहन महामंडळाच्या ब्रीद वाक्याला तिलांजली मिळत आहे. दि. ९ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजतादरम्यान शिवणीबांध गावाजवळ जंगल शिवारात एकाला वाचविण्याच्या नादात बस अनियंत्रित होऊन जंगलातील एका झाडावर धडकली. त्यात एसटीमधील तीन प्रवासी जखमी झाले होते. सदर बस साकोली येथून प्रवासी घेऊन नवेबांध येथे जात असतांना अपघात घडला होता. या घटनेची शाई वाळते न वाळते दि. ११ जून रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान ओव्हरटेक करणार्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित घरावर आदळली. त्यात ६ प्रवासी जखमी झाले. तीन दिवसात एसटीचे दोन अपघात घडल्याने एसटीच्या प्रवासाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर दि.९ जून रोजी तुमसर जवळील खापा चौकात अकोला-तुमसर (ST Bus Accident) एसटीबसला ट्रकने धडक दिली. त्यात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.