लातूर (Latur) :- अनेक युवती गरिबीचे कारण दाखवून नेतृत्व सिद्ध करण्यापासून दूर जातात. गरिबीचे भांडवल न करता त्यावर मात करून वेगवेगळ्या क्षेत्रात यशाच्या उंच शिखरावर आपण जावं आणि आपले नेतृत्व सिद्ध करावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या (Congress) राष्ट्रीय अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी येथे केले.
मराठवाडा विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व विकास कार्यशाळा येथील जय क्रांती महाविद्यालयात पार पडली
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठस्तरीय युवती नेतृत्व विकास कार्यशाळा येथील जय क्रांती महाविद्यालयात पार पडली. या कार्यशाळेत 120 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेचा समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सलगर बोलत होत्या. यावेळी मंचावर युवती शहराध्यक्ष कल्पना फरकांदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले, कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रमोद चव्हाण, स्टाफ सेक्रेटरी डॉ. संगीता घार उपस्थित होत्या. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. श्रीधर कोल्हे म्हणाले की, यशाच्या उंच शिखरावर गेलेले 90 टक्के लोक हे प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या बळावर मोठी झालेली आहेत. ज्याच्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची धमक आहे त्याचे व्यक्तिमत्व सिद्ध करण्यात कुणीही अडथळा आणू शकत नाही, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण, सूत्रसंचालन डॉ. केशव आलगुले आभार प्रा. प्रज्ञा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. गीता वाघमारे, डॉ. समिना शेख, डॉ. रामेश्वर स्वामी, प्रा.प्रज्ञा स्वामी, प्रा. प्रज्ञा कांबळे, प्रा. प्रकाश भिंगे, प्रा.शिवराज बाजुळगे, डॉ.राजेश करंजकर, डॉ. राजाभाऊ पवार, डॉ.हरिश्चंद्र चौधरी, डॉ.अविनाश पवार,जाधव रामदास, सय्यद इब्राहिम, अमित भालके यांनी परिश्रम घेतले.