मुंबई (Salman Khan Firing Case) : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) सध्या खूपच चर्चेत आहे. 14 एप्रिल 2024 रोजी मुंबईतील वांद्रे भागात सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दोन शूटर्सनी गोळीबार केला होता. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाच्या पोलिस तपासात समोर आले की, सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीचे सदस्य होते. आता (Mumbai Police) पोलिसांच्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात काही नवीन धक्कादायक खुलासे झाले आहेत.
6 जणांना 20 लाख रुपयांची सुपारी
माहितीनुसार, (Mumbai Police) पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये गुंड लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने बॉलिवूड सुपरस्टारच्या हत्येसाठी सहा जणांना 20 लाख रुपयांचे कंत्राट दिल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मकोका) खटल्यांचे विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी अनमोल बिश्नोई आणि रोहत गोदाराविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याप्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी 14 एप्रिल 2024 रोजी सकाळी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता.
अनमोल बिश्नोई आणि रोहित गोदरा फरार
लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि (Lawrence Bishnoi) बिश्नोई गँगचा कथित सदस्य रोहित गोदारा यांच्या विरोधात मुंबईच्या विशेष न्यायालयात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्यानंतर ही मोठी अपडेट समोर आली आहे. मात्र, हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अनमोल बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि रोहित गोदरा हे दोघेही (Mumbai Police) मुंबईतून फरार झाले आहेत.
14 एप्रिल 2024 रोजी झाला होता गोळीबार
14 एप्रिल 2024 रोजी (Salman Khan) सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy Apartment) झालेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या महिन्याच्या सुरुवातीला दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये (Lawrence Bishnoi) लॉरेन्स बिश्नोईसह रोहित गोदारा आणि अनमोल बिश्नोई यांची वर्णी लागली होती. लॉरेन्स बिश्नोई हे सध्या अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहेत. माहितीनुसार, अनमोल बिश्नोई आणि रोहित गोदरा हे कॅनडात आहेत.