मुंबई (Mumbai) : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार प्रकरणी (Mumbai Police) मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींविरुद्ध मकोका (Maharashtra Control of Organized Crime Act) कलमे लागू केली आहेत. गुजरातमधील साबरमती तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला ताब्यात घेण्यासाठी (Mumbai Police) मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. माहितीनुसार, पोलिसांनी लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल याच्या विरोधात लुकआउट सर्कुलर जारी केले आहे.
वास्तविक, सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार झाल्यानंतर त्याने या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती. (Mumbai Police) मुंबई पोलिसांनी सांगितले की, अनमोल बिश्नोईने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती आणि तपासात त्याचा सहभागही उघड झाला होता. त्यानंतर (Mumbai Police) मुंबई पोलिसांनी ‘लूकआउट सर्कुलर’ जारी केले. या प्रकरणी अनमोल आणि लॉरेन्स बिश्नोई यांची वॉण्टेड आरोपी म्हणून नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अनमोल कॅनडामध्ये राहत असून, फेसबुक पोस्टद्वारे त्याने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली, त्याचा आयपी पत्ता पोर्तुगालचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर विक्की गुप्ता (24) आणि सागर पाल (21) यांना सोनू कुमार सुभाष चंदर बिश्नोई (37) आणि अनुज तपन (32) यांच्यासह अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल हे बिहारचे रहिवासी असून, 15 मार्च रोजी सोनू बिश्नोई आणि अनुज तपन यांनी (Salman Khan) सलमानच्या घरी गोळीबार करण्यासाठी त्यांना दोन देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसे दिली होती. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोठी कारवाई करण्यात आली असून, पोलिसांकडून मकोका (Maharashtra Control of Organized Crime Act) कारवाई करण्यात आली आहे.