पुसद (Samanak Janata Party) : महामानवांच्या विचारधारेवर निर्माण झालेली परिवर्तनवादी एक राष्ट्रीय चळवळ म्हणून शिक्षण, संविधान व शेतीसह सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी दीड वर्षांपूर्वी माहूर येथे समनक जनता पार्टीची (Samanak Janata Party) स्थापना करण्यात आली. होणाऱ्या विधानसभा दृष्टीने पुसद विधानसभा मेळावा आज येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे दु. १२ वा. मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
उपस्थित समनक जनता पार्टीच्या (Samanak Janata Party) कार्यकर्त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, राष्ट्रीय महासचिव डॉ. अनिल राठोड, प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, जिल्हा निरीक्षक गजानन धामणे,सौ.आयुषी राठोड, सौ. शीतल राठोड, तालुका अध्यक्ष विलास आडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्या करिता पवन जाधव, देवाशिष राठोड, जय राठोड आरेगाव, डॉ. धीरज नायक, सुमित राठोड इत्यादी परिश्रम घेत आहेत.