समता परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार
हिंगोली (Chhagan Bhujbal) : नुकत्याच राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते तथा माजी मुख्यमंत्री आ. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुती सरकारने मंत्रीमंडळात स्थान दिले नसल्याने हिंगोलीत समता परिषदेच्या पदाधिकार्यांनी सोमवारी बैठक घेवून निषेध नोंदविला.
मागील अनेक वर्षापासुन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे ओबीसीचे नेतृत्व करीत असून राष्ट्रीय व राज्य स्तरावर त्यांनी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी नेहमीच लढा चालु ठेवला. नुकत्याच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे घवघवीत यश संपादन झाले. नागपुर येथील अधिवेशन दरम्यान १५ डिसेंंबर रोजी राज्य मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी नेते आ. छगन भुजबळ यांना सरकारने मंत्री मंडळातुन वगळल्याने १६ डिसेंबर रोजी हिंगोलीत समता परिषदेच्या पदाधिकार्यांची तातडीची बैठक समता परिषद जिल्हाध्यक्ष चंदु भाऊ लव्हाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
या प्रसंगी चंदु भाऊ लव्हाळे यांनी बोलताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याच्या सुचना ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिल्या होत्या. त्यानुसार राज्यात सर्वच ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे ओबीसी समाज खंबीरपणे उभे राहिल्याने महायुतीचे २३० आमदार निवडुन आले. परंतु गरज सपताच ओबीसीचे नेते व ओबीसींना राज्याच्या राजकारणातुन डावलण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच उद्देशातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्री मंडळातुन डावल्यात आले आहे. त्यामुळे हा अन्याय समता परिषद कदापीही खपवुन घेणार नसून भविष्यात ओबीसी नेते भुजबळ हे जो काही निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी हिंगोली जिल्ह्यातील समता परिषद ठामपणे उभे राहणार असल्याचा निर्धार केला असल्याचे लव्हाळे यांनी आपल्या मनोगतात बोलतांना साांगितले.
यावेळी समता परिषद महिला अध्यक्षा श्रीमती वनीताताई गुंजकर, जयश्रीताई सातव, ज्योती दिघडे, मिराताई राऊत, मंदाताई पारिसकर, बालाजीराव सोनवणे, डॉ. रवि थोरात, समता परिषदेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर उबाळे, वसंत वाघ, संतोष भुसांडे, भागवत बोधने, प्रभाकर पारिसकर, अक्षय लव्हाळे, नागशे धनमने, संदिप भुसांडे, राजु लव्हाळे, विजय बनचरे, मारोती बनसोडे, संग्राम पांडुुळे , गणेश कोंडाने, रोहित चौधरी, स्वराज वाघ, गणेश बंबरुले, राजु बनचरे, पवन मुळे, आकाश मोटे, चेतन कोंडाने, शतपाल यादव, रितेश शहाणे, विवेक वानखेडे, सुशिल कसबे, आशिष मुधळे यांच्यासह अनेक समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.