कवडसा

“ तोषोनि मज द्यावे .....”

कोणतेही, आणखी कितीही चांगले विचार ठेवावेत, माणसाने कितीही चांगलं काम करावं, काहीही चांगलं करावं, तरी लोक त्यावर टीका करतात, बिनबुडाचे आरोप करतात.

“ तोषोनि मज द्यावे .....”

कोणतेही, आणखी कितीही चांगले विचार ठेवावेत, माणसाने कितीही चांगलं काम करावं, काहीही चांगलं करावं, तरी लोक त्यावर टीका करतात, बिनबुडाचे आरोप करतात. करोत बिचारे! त्याने काहीही होत नाही. उलट बदनामी करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना लोक ओळखून असतात, ते योग्यवेळी तसं दाखवून देतात. लोक बिनबुडाचा आरोप करतात मात्र ‘एकला चलो रे’ च्या तत्त्वानुसार आपलं काम माणसाने करीत राहावं. लोक टीका करणारच. कुठला तरी आरोप करणारच असतात, मात्र तो खरा नसतो,

मागणी कुणाची काय असेल सांगता येत नाही. त्याचं कारणही तसंच आहे. माणूस तितक्या प्रवृत्ती हे खरं आहे, बरं का! आपलं भलं व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपल्याला अपेक्षित मिळावं, ही भावना सर्वसामान्य आहे आणि ती चुकीची मुळीच नाही, कारण ती नैसर्गिक आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणूस काही मागणी करतो, ते इतरांसाठी, लोकांसाठी, ज्यांना काहीतरी हवं आहे त्यांच्यासाठी! संत ज्ञानेश्वर माऊली हेच मागणं करतात जे अनेकांच्या मनात आहे, ते पूर्ण व्हावे, अशी इच्छा त्यांनी करणं काय चुकीचं ठरतं? माणूस धडपड करतो, प्रयत्न करतो मग कारण कोणतंही असो, त्यासाठी त्याची धडपड ही महत्त्वाची ठरते. ही धडपड कामी येणारच असते मात्र त्याला काही अवधी लागतो, तो देणं माणसाच्या हाती असतं आणि धडपड न थांबवणं हेही माणसाच्या तेवढंंच हाती असतं. आपण ते केलंच पाहिजे यात शंकाच ती काय?
कारणं अनेक असू शकतात. इच्छा वेगवेगळ्या असू शकतात मात्र त्या इच्छा फक्त स्वतःसाठी असतात असं नाही तर अनेकांसाठी असतात. त्या पूर्ण व्हाव्यात त्यांना संधी मिळावी, असं कुणाला नाही वाटत?  सगळ्यांनाच वाटतं. मनापासून वाटतं म्हणूनच संत ज्ञानेश्वराची, त्यांच्या ओव्यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही.
कोणतेही, आणखी कितीही चांगले विचार ठेवावेत, माणसाने कितीही चांगलं काम करावं, काहीही चांगलं करावं, तरी लोक त्यावर टीका करतात, बिनबुडाचे आरोप करतात. करोत बिचारे! त्याने काहीही होत नाही. उलट बदनामी करणाऱ्यांना, आरोप करणाऱ्यांना लोक ओळखून असतात, ते योग्यवेळी तसं दाखवून देतात. लोक बिनबुडाचा आरोप करतात मात्र ‘एकला चलो रे’ च्या तत्त्वानुसार आपलं काम माणसाने करीत राहावं. लोक टीका करणारच. कुठला तरी आरोप करणारच असतात, मात्र तो खरा नसतो, कारण माणसाला माहीत असतं तो कसा आहे. यासाठीच की काय प्रसिद्ध शायर डॉ.मोहम्मद रफी म्हणतात- 
मै कैसा हूं, क्या हूं
कोईभी नाम रख दो 
मेरे सर पे भी 
कोई  इल्जाम रख दो
कारणे अनेक असू शकतात. इच्छा अनेक असू शकतात मात्र त्या इच्छा फक्त स्वतःसाठी असतात असं नाही तर अनेकांसाठी असतात. त्या पूर्ण व्हाव्यात,  त्यांना संधी मिळावी असं कोणाला नाही वाटतं? मनापासून वाटतं, म्हणूनच संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. 
प्रसिद्ध शायर गुल्जार वफा चौधरी असेही म्हणतात की -
हमे तो लडना ही था 
इंसाफ के लिए 
ते किल क्यूं सलीब में
नाहक जडे गये 
सर्वच क्षेत्रातील लोक मनात येईल तसं बोलतात, आरोप करतात, टीका करतात मात्र माणसानं आपलं काम करीत राहावं, एवढं मात्र खरं! 

 

 प्रा.डॉ.मोहन खडसे 
 मो. ९८२३२८९०१० 
(प्रस्तुत लेखक हे प्रसिद्ध स्तंभलेखक, शिक्षणतज्ज्ञ असून त्यांच्या
सावित्री फाउंडेशन, अकोला या त्यांच्या संस्थेच्या
माध्यमातून सक्रिय सामाजिक  व शैक्षणिक कार्य करतात.)