जन-गण-मन

प्रश्नांच्या चक्रव्यूहातली भारतमाता!

भारताची संरक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, न्यायव्यवस्था, यासह एकूणच संपूर्ण राज्यव्यवस्थेबाबत, खालील काही राष्ट्रनेत्यांनी काही (अनुत्तरित) प्रश्न उपस्थित केले आहेत

प्रश्नांच्या चक्रव्यूहातली भारतमाता!

अतिशय जबाबदार अशा राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिवादी, विचारवंत व देशभक्तांकडून असे किती तरी प्रश्न विचारले जातात, पण त्यांची उत्तरे मात्र दिली जात नाहीत! दुर्लक्ष करावे मग ओरडणारे ओरडून ओरडून गप्प बसतात आणि लोकही विसरून जातात! हा कदाचित त्यांचा होरा असावा! पण लोक प्रश्न विचारणारच. आणि मोदीजी, “हे चालू न देणे” याला तुम्ही  “अराजकता” म्हणता, हे ही एकदा तुमच्याच समर्थकांना सांगा, बघू त्यांना (तरी) पटते का?

मागील काही काळात भारताच्या अतिवरिष्ठ पातळीवरील अनेक बुद्धिवंत, विचारवंत आणि विद्वानांनी आणि विशेषतर: या देशाला यशस्वीपणे व निष्कलंकपणे चालविणाऱ्या राष्ट्रनेत्या मंडळींनी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताची संरक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, न्यायव्यवस्था, यासह एकूणच संपूर्ण राज्यव्यवस्थेबाबत, खालील काही राष्ट्रनेत्यांनी काही (अनुत्तरित) प्रश्न उपस्थित केले आहेत- (विशेष हे की हे बहुतेक गैरराजकारणी होते! त्यामुळे “ते राजकारण करतात”असे म्हणून उडवून लावायलाही वाव नाही.)
भारताचे क्र२ चे ज्येष्ठ असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कौल, भारताचे सरसेनापती  जनरल नरवणे, भारताचे अर्थसचिव सुभाष गर्ग, नोबेल विजेते अमर्त्य सेन, रिझर्व्ह बॅंक गव्हर्नर डॉ. आचार्य, डॉ. राजन, डॉ. सुब्रमण्यम,जन.बक्षी, अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर, न्या.मार्कडेय काटजू न्या.ओक, न्या.भुईया, न्या.कोळसे पाटील, न्या.रामण्णा, ॲड. प्रशांत भूषण, न्याय. रेखा शर्मा, सोनम वांगचुक, देशाच्या सीमादलाचे प्रमुख/डी.जी.शत्रुजित कपूर, सध्याचे दोन निवडणूक आयुक्त, ईत्यादी असे १०० ते २०० बुद्धिमान, प्रामाणिक देशभक्त काही गंभीर असे प्रश्न उपस्थित करतात, पण त्यांना उत्तरेच का दिली जात नाहीत? हे लोक देशाच्या सर्वोच्च ठिकाणी देशसेवा बजावत असलेले किंवा बजावलेले आहेत (समजा ते बोलले ते चुकीचे असेल तर, मग सरकारकडून ते खोडून काढण्याऐवजी वेबसाईटवरून काढून टाकणे हा एक प्रकारचा पळपुटेपणा का केला जातोय?  हा प्रश्न एक सामान्य नागरिक म्हणून आपणास का पडू नये? खोटे असेल तर तसे का सांगत नाहीत?  आपण या देशाचे नागरिक म्हणून या देशाच्या शीर्षस्थ बुद्धिवंतांनी कोणकोणते प्रश्नउपस्थित केलेत? व ते आपल्या देशाच्या भवितव्यासाठी अनुत्तरित राहणे चांगले आहे का? हे प्रश्न काय होते? ते पाहू या-
(१)न्यायमूर्ती रेखा शर्मा म्हणाल्या देशामधील न्यायमूर्तींची नेमणूक करणारी पद्धत अतिशय चुकीची आहे, अनेक न्यायमूर्तीचे नातेवाईक नेमले जातात, पात्र असलेले (न्याय. अकील कुरेशी सारखे) मुद्दाम डावलले जातात, आणि घटनाबाह्य व विद्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते.एका मुस्लीम महिला सेना अधिकाऱ्यांवर घाणेरडी टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या न्यायाधीशास मात्र सतत बदल्या करून छळले जाते! हे प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका हायकोर्टाच्या न्यायमूर्ती मॅडम  हे का बोलतात? लोकांना उत्तर हवे!
(२) न्या. अभय ओक म्हणतात की,सरकारकडे न्यायाधीश नेमणुकीच्या फाईल्स का दाबून ठेवल्या जातात? हे विचारले पाहिजे, निवडणूक आयोगास वैधानिक नमुना-बदलाचा अधिकार आहे का? हे पाहिले पाहिजे, आणि याबाबतच्या निकालाचा पुनर्विचार आवश्यक आहे. तसेच ठराविक केस ठराविक जजकडेच देण्याचा जो सरन्यायाधीशांचा निर्णय आहे त्यात अजूनही सुधारणेची गरज आहे, जनतेने काय समजावे?  (अदाणीच्या बहुतेक केसेस एकाच जजकडे कशा गेल्या व त्यात पुढे काय झाले? हे प्रशांत भूषण यांनी जाहीर सांगितले आहे !)
(३)पेगासस या स्पायवेअरचा गुन्हेगारी पद्धतीने राजकारणासाठी गैरवापर झाला काय? यावर न्यायमूर्ती रामण्णा म्हणाले की, सरकारने सतत “संरक्षण गोपनीयतेचे” कारण देणे योग्य नाही.
जस्टीस रवींद्रन कमिटी नेमली, पण सरकारने काहीही सहकार्य केले नाही व सुस्पष्टपणे फोनमधे हे इस्रायली स्पायवेअर वापरले नाही हे म्हटले नाही! (इस्रायली सरकार म्हणते की त्यांनी सरकारशिवाय कोणालाच विकले नाही तर,याचा गैरवापर करून “ब्लॅकमेलींग” करत
गुन्हेगारी कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आले !)
जस्टीस रवींद्रन समितीने “सरकारने सहकार्य करण्यास नकार दिला !” हे नमूद केले होते!
जस्टीस रामण्णांचा हा प्रश्न देशाच्या संपूर्ण व्यवस्थेला ब्लॅकमेल करण्याकडे लक्ष वेधतो!
या प्रश्नाच्या उत्तरात अनेक उत्तरे दडली आहेत 
(४) भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे (ITBPचे) डायरेक्टर जनरल शत्रुजित कपूर म्हणाले की, काही वर्षात चीन भारतात घुसला, आणि आज आपण पारंपरिक पद्धतीने त्यांचा सामना करू शकत नाही (एवढे दुबळे बनलेले आहोत !) मग “कोई अंदर आया नही” हे संसदेतील वक्तव्य देशाची फसवणूक नव्हे काय ?
(५) देशाचे तत्कालीन केंद्रीय पॉवर सेक्रेटरी श्री. सरमा व कोळसा सचिव अनिल स्वरूप या दोघांनीही कॅबिनेट सचिव श्री. गौबा यांना पत्र लिहून अशी विचारणा केली की, कोळशाचे सरकारी धोरण अदाणीला फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून कोळसा आयातीसाठी दबाव आणण्यास वापरले गेले, यात देशाचे प्रचंड नुकसान झाले!
आता हा लेख वाचणाऱ्यांनी हा कलगीतुरा जो देशाच्या सर्वोच्च ब्रुरोक्रॅटमधे रंगला तो, छे छे आमचा या देशाच्या लुटीशी काय संबंध? असे म्हणून आपले (आंधळे) डोळे भक्तिभावाने बंद करायचे की उघडायचे? हा ज्याचात्याचा प्रश्न!
(६) देशाला १ नव्हे ३ निवडणूक आयुक्त आहेत हे सर्व समान अधिकाराचे आहेत. फक्त एकाकडे समन्वयापुरती जबाबदारी आहे, मात्र ३ पैकी २ मताने झाला तोच “आयोगाचा निर्णय” असतो. २ जण (तेही पत्र लिहून )
म्हणालेत की “ कित्येक महिन्यात बैठकच नाही, आम्हाला काही न विचारता निर्णय झाले व राबवलेही”मग हे निर्णय, बेकायदा माणसाने घेतले होते त्याला ताबडतोब “घटनाबाह्य वर्तनासाठी” निष्काशित कोण करणार ? यासाठी संसदेने (समजा) सर्वांनी मिळून एकमताने त्या तोतया माणसास माफ केले तर,  आम्हा भारतीयांनी त्या “घटनाबाह्यतेसह त्याला” स्वीकारलेच पाहिजे काय?  ईम्युनिटी जर असेलच तर ती आयोगाच्या कामासाठीच आहे! हे ग्यानेश जर (बिना बहुमत ठरावाने-) काम करत असतील तर ते आयोगाचे नव्हेच ! मग या “तोतया” वर कारवाईस काय अडचण? हा प्रश्न आहे! इथे ईम्यनिटी लागू न करता (तोतयेगिरी असल्याने)
थेट कोठडी हवी! पण तरीही कोण वाचवतंय? (आणि जर २ आयुक्त म्हणाले ते खोटे असेल तर त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरीस पत्र का लिहिले)
हा देशाचा प्रश्न आहे! जनतेला उत्तर द्या!
(७) आरएसएसशी संबंधित पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ या व्यक्तीचा एक व्हिडिओ व्हाटस ॲपवर आहे ज्यात ते “होय आम्ही कागद दाखवून दबाव आणला व निर्णय मिळवला!” हा दावा करताना दिसतो! या व्हिडिओचा खरेखोटेपणा माहित नाही, पण तो खोटा असेल तर तसे स्पष्ट 
करावे आणि खरा असेल तर प्रश्नच संपला!
(८) भारताचे माजी अर्थसचिव श्री. सुभाष गर्ग यांनी २ सप्टेंबरला NDTV ला दिलेल्या एका मुलाखतीत जीडीपी ७.८ नव्हे तर(चालू किंमत)
लक्षात घेता फक्त २.३ % आहे असे म्हटले, देशाच्या जनतेने काय खरे समजावे? उत्तर द्या.
(९) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठता क्रमाने क्र. २ चे न्यायमूर्ती राहिलेले श्री. कौल यांनी एक पुस्तक लिहिले/मुलाखती दिल्यात.
ते म्हणतात की, न्यायमूर्तींची निवड करताना त्यांनी एका नावास विरोध केल्यावर त्यांना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, 
“ हे नांव वरून आले, हवे तर सरकारमधील “त्यांचेशी” बोलणे करून घेऊ” याचा अर्थ न्यायमूर्ती हे सरकारला हवे तेच व्हावे! हा दंडक होता तर? आमची न्यायालये राजकारण्यांपासून आमचे रक्षण करतील याची अपेक्षा तरी कशी ठेवावी? (१०) काल परवा एक भयंकर विनोदी घटना घडली! एकनाथ शिंदेंचे वकील कोर्टात म्हणाले की, “जाऊ द्या ना आता, आमच्या आमदारांनी आता तो कार्यकाळ पूर्णही केला! आता काय उपयोग शिंदे खरे की ठाकरे खरे, ठरवण्याचा?
(बलात्कारानंतर मूल झाल्यामुळे आता त्या बलात्कारास हनीमून समजावे, हा सूर होता !)
कित्ती कित्ती नैतिक युक्तिवाद! सुरुवातीला न्याय चेंडूसारखा टोलवत रहायचा व शेवटी हात वर करायचे! घटनेच्या परिशिष्ट १० मधे म्हटल्याप्रमाणे फुटीर गटाने दुसऱ्यात विलीन होण्याला पर्यायच नसेल व विधिमंडळ पक्ष हा नव्हे तर राजकीय पक्षच “प्रतोद नेमणुकीसाठी ग्राह्य असेल तर, कोणत्या कारणाने राज्यावर “अधिकृत”म्हणावी की “अनधिकृत टोळी” राज्य करत होती? हे जनतेला कळलेच पाहिजे, कारण वरील हे २ मुद्दे तर अंतरिम सुनावणीतच ठरले होते ! ॥या प्रश्नाला उत्तर नव्हते, जनता केविलवाणी॥
या संपूर्ण प्रयोगात कोणते कोणते कलाकार सहभागी झालेत? कोणते “बॅकस्टेज”आर्टिस्ट होते? हा संपूर्ण नाट्यप्रयोगच रोमांचक होता.
यात जे जे नागडे झालेत त्यांना डोळे भरभरून पहायला भक्तीभावाने ओथंबलेले आंधळे डोळे थोडे उघडले तरी सत्यदर्शन सहज शक्य आहे.
यात आमचं काय चुकलं? हाच लोकांचा प्रश्न! (११) कारवा मासिकात आलेल्या व पेंग्विन या प्रकाशनाकडून प्रकाशित होणार असलेल्या जनरल मनोज नरवणेंच्या पुस्तकामधे आपल्या सर्वोच्च सरसेनापतींनी काय लिहिलेले आहे?
जेव्हा ऑगस्ट २०२० मधे पूर्व लडाखमध्ये भारतीय प्रदेशात चिनी रणगाडे घुसले त्यावेळी दिल्लीत संरक्षण मंत्री-व प्रधानमंत्र्यांना सेनेने विचारले “काय करावे?” त्यावर ते काहीच बोलत नव्हते! शेवटी पुन्हा पुन्हा विचारल्यावर म्हणाले- “जो उचित लगे वो करो !”असा आहे. 
“देश सुरक्षित हातोमे !” 
आणि आपले हे “शौर्य” बाहेर येऊ नये म्हणून या २ महापुरूषांनी काय करावे? तर ताबडतोब  “जनरल नरवणेंना पुस्तक छापू नका” अशा सूचना देऊन सत्य झाकण्याचा प्रयत्न केला!
नरवणेंचे हे म्हणणे खरे होते काय? मोदीजी हे अनेकदा चीनला गेलेले असताना, चीनला ते एवढे का घाबरावेत? हा जनतेचा प्रश्न आहे!
(१२) एप्सटिनला ४ दा भेटलो म्हणणारा १४ वेळा का भेटला? व हे १४ चे ४ असे खोटे तो बोलल्यावरही त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याएवढे त्या व्यक्तीला सरकारने का घाबरावे? हा लोकांना पडलेला प्रश्न आहे. 
असे किती तरी प्रश्न अतिशय जबाबदार अशा राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिवादी, विचारवंत व देशभक्तांकडून विचारले जातात, पण त्यांची उत्तरे मात्र दिली जात नाहीत! दुर्लक्ष करावे मग ओरडणारे ओरडून ओरडून गप्प बसतात आणि लोकही विसरून जातात! हा कदाचित त्यांचा होरा असावा! पण लोक प्रश्न विचारणारच. 
आणि मोदीजी, “हे चालू न देणे” याला तुम्ही  “अराजकता” म्हणता, हे ही एकदा तुमच्याच समर्थकांना सांगा, बघू त्यांना (तरी) पटते का?

पुरुषोत्तम गावंडे 
७९७७१६३७७४