उरे रामरामहो जानरावभौ! या भरेल बजारात हाती रीकामे झोरे घीवून कसे काय हिंडून रायले? सरकारी ‘चेंढायन्याचे’ पाच हजार आले नाईत काय तुमच्या खात्यात! काळा नं पटकन पैसे अन् करा धुमधळाक्यात दिवाईचा दन्नावून बजार?
अबे ओ दसनंबरी बाबुराव! तुले ‘समजे ना उमजे’ तरी काहाले झीलप्या झाळाचा शोक लागला बे बयताळबेलन्या! पयले ससरीच्या या बजारातली भळकेल म्हागाई पाय कशी रन्नावली तं? उबाऱ्यावानाचा मले म्हंन्ते कुठी हिंडून रायले रीकामे झोरे घीवून बजारातल्या रस्त्यानं! हेंबाळथुतऱ्या मले शिकोयाले चाल्ला ईच्यामायले! पयलेच तं मान्साची तयपायातली आग मस्तकात जायेल या म्हागाईतल्या दिवाई बजारानं अन् सरकारच्या पाच टिकल्याच्या चेंढायन्यानं! हा रीकामचोट बाबुराव चाल्ला ससरीचा ‘खीशात नाई दमळी- ईकत आन्याले निंगाला कोंबळी’, ‘दायदाना-आटापीटा का मालुम नई भावटाव अन् निकला बजार खरीदनेकु गल्लीमेका बाजीराव’! ईतकं बंगरसे काम चालु हाये तुवं भर हंगामाच्या टायमाले! मले तं वाट्टे तुबी ससरीच्या आपल्या हेंबाळ्या सरकारवानी बेसरम व्हवून ‘आऊट ऑफ कव्हरेज’ क्षेत्राच्या भाईरची केस झाला?
पयलेच तं आपलं सरकार खुटीउपळ धंद्यात अन् सरकारी योजनेत ‘पाचर’ ठोकून त्या योजनेची ‘बंडी उलाय’चा हायहोल्टेज ड्रामा कराले येक नंबर तरबेज हाये! पन तरी तु चम्मचघोट्या असल्यानं तुले येक गोठ सांगतो! कान दीवून आईक!
येका वायेल झाळाच्या खोळावर येक वान्नेर भुकीनं तळफळत बसेल व्हतं! तथी येक बेपारी आला. त्यानं त्या खोळाच्या कीरीत वान्नेराले खायाले जोळचे फुटाने टाकले! पन त्याचा हात त्या फुटान्यालोग पुरेना! मंग त्या बेपारी दलालानं त्या कीरीत येक लाकळाची खुटी ठोकून कीर फाकोली अन् आखीन मुठभर फुटाने त्या कीरीत ओतले! वान्नेर बेज्या खुस झालं! त्याले वाटलं आता आपल्याले पोटभर फुटाने खायाले भेट्टातातच! मंग वान्नेरानं जसा कीरीतला फुटाने खायाले हात घातला तशी बेपाऱ्यानं ठोकेल खुटी दलालानं उपसून काळली अन् फुटाना खानाऱ्या वान्नेराचा आपोआप त्या खींडीत हात अटकला अन् चेंदामेंदा झाला! अशी गोठ सद्या बाबुराव आपल्या कष्टकरी ‘शेतकऱ्याची’ व्हयेल हाये गळ्या! या सरकारनं तं ईच्यामायले खोटे आस्वासन दिवू दिवू शेतकऱ्याले फोस्या पुरनपोईच्या घोयनात ‘घोयनं’ लावलं! जसी कर्जमाफीची यैतीहासीक फुसकी घोषना करुन सालभरापासून टप्प्याटप्प्याच्या तितंब्यानं, अटी-शर्तीच्या जबरदस्तीनं, केवायसीच्या ढोरकोंब्यानं ‘गाभन’ ठुनं जथी-तथी येरझारा माराले लावून रायलं तसीच गोठ आता या दिवाईच्या पाच हजाराच्या चेंढान्याईत तेतीस टक्के नुकसानीची ‘पाचर’ हे चतरं सरकार ठोकते वाट्टे! म्हंजे ‘मुँंह मे राम और बगलमे छुरी’ अशी फसवी नीती देवानाथाभौची दिसते!
सांगा बरं बापहो, औंदाच्या भीषन दुस्कायात या सरकारी योजनेले च्युवत्याचा ‘बजार’ म्हनावं का आनंदाचा ‘सीधा आटा’ म्हनावं? मतदानाच्या आंधी खन्नावून पोटभर भेट्टे पन दुस्कायात ‘कोनाले कनभर तं कोनाले मुठभर’, मातीत टोले घेनाऱ्याले चिमुटभर तं भुमीहिन बेपाऱ्याईले फुल्लं ‘ढेरीभर’ हमखास भेट्टे! अशी ‘नवलाई’ची कपटनीती वापरुन हे छाकटं मायबाप सरकार बळीराजाले ‘अळान्याचा बजार’ समजून रायलं? औंदा येका पान्यानं हजामत केली म्हनून बळीराजाच्या हाथातोंडासी येल घास निसर्गानं हिसकोला! म्हनून बळीराजाच्या पुळे दुस्कायाचा महाराक्केस उभा रायला! त्याच्या कायजातल्या अंधारातून उजीळाले पकळ्याले जानाऱ्या दिवाईत औंदा कायाकुट्टं अंधारापरसबी पोटातल्या ‘तानभुकीचा’ आगडोंब उसयेल हाये! बारोमासाच्या बजेटाची शिदोरी फाटली, लेकीच्या लगनाची, फाटक्या सोंसाराची, लेकराईच्या शिक्शनाची ज्ञानगंगा आटली! ढोरंवासरं हंबरुन म्याट झाले, वावरातले पिकं पान्यासाठी तळफळून सोकले, रंधावनातला कोपर पीठाची वाट पावून रायला, डोयापुळे धुमधळाक्यात येनारी दिवाई दारात उभी हाये, आंगनातल्या तुयसीजोळच्या दिव्यात, भाजीच्या फोळनीच्या गंजात तेल नाई, घरात दायदाना नाई मंग गळेहो बळीराजानं पोटातल्या भुकीसाठी चुल पेटवावं कशी?
असा कायाकुट्टं ईचाराचा ‘काळोख’ हरेक बळीराजाच्या कायजात दाटेल हाये! बळीराजाच्या ओल्या जखमीवर फुसक्या घोषनेईचं मीठ चोवून हे बाजिंदं सरकार ‘अंधयाच’ सोंग घीवून पाच टिकल्याच्या ‘चेंढायन्या’ कऱ्यात गुतेल हाये!
कोन्त्याबी सरकारी योजनेत अटीतटीची, हजारखेप केवायसीची उरफाटी ‘पाचर’ची खुटी ठोकून, त्या महाभारतातल्या शकुनीमामावानी ‘फासा’ फेकून या काया मातीतल्या अभिमन्युले चक्रव्युहात फसोयातच धन्यता मानते! गळेहो राजकारनातले बिलंदर राजोटे सोताले गंजातल्या दुधावरची ‘साय’ खानारे गोळबोले मिठ्ठू अन् मातीत हेलपाटे घेनाऱ्या बळीराजाले ‘अळानटप्पु पोशिंदा’ समजतात!
कार्तिक मयना म्हंजे देवभक्तीचा, सनासुदिचा, दिपज्योतीच्या उधानाचा लोकोत्सव असते! आंगनातलं सळासारोनं-रांगोई, झाकटीत उठून आंगाले किक्सा लावून, ‘उठा उठा दिवाई आली मोदी साॅरी ‘मोती’ साबनानं आंघोय कराची येळ झाली’ अशी टीवीवरची आरोयी, देवळातली काकळारतीचा घंटानाद, घराघरातल्या देव्हाऱ्यातल्या पेटेल दिपज्योती, अभंगाचे मंजुळ आलाप, ‘अलंकापुरी पुन्यभुमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुन्यरासी, नमस्कार माझा ज्ञानोबा-तुकोबा माऊलीसी’! असा मनाले भुल पाळनारा वारकऱ्याईचा भक्तीमय कंठ, संगं टाळमृदुंगाचा गजर अशा थाटाबाटानं सजेल, सुगरनच्या खोप्यावानी ईनेल आमची ताकदबाज ‘संस्कृती’ असलीतरी औंदा दुस्कायाच्या ईचारानं बळीराजाच्या कायजात अंधार दाटेल हाये! पन बळीराजाच्या पोटातल्या तानभुकीच्या अंधारात चतुर सरकारच्या खोट्या आस्वासनाचे फुसके मीठ्ठूछाप अटीशर्तीचे ‘फटाके’च धळामधुम फुटनार हायेत!
चिरांगनावीना साजरी कशी दिवाई
बीना तेलाची कशी पेटील झेंडवाई?
पोटातल्या भुकीले ठेवू जरी झाकून
अंधारातल्या उजीळाले मुजरा वाकून?
नातंगोतं सोयरपनाचा आटला रे झरा
पाच टिकल्याईत कशी व्हईल रे
साजरी दिवाई सांग हेंबाळ्या सरकारा?
गरीबाच्या आंगावर बोकांडली म्हागाई
कष्टकऱ्याची कदर कराले अक्कल नाई?
काट्याकुट्याचं जगनं ईचारु नोका सरकारले
तेईचा हेला गाभन रायते, मालुम नसते कोनाले?
आपलं तानभुकीनं भुकेजेल पोट जरी
तेईची चरबीनं ऊतु येल असते ढेरी?
कुंभमेळ्यातल्या खर्चानं तिजोरी झाली रीती
दुस्कायात अंधारातल्या कशा पेटतील वाती?
बळीराजा झोपला जरी उपाशीपोटी
आमची लळाई सुरुच दुस्कायासाठी?
गुदगुल्या
दुस्कायी ईचाराच्या पेटल्या रे राती...! मातीच्या दिव्यातल्या कई पेटतील वाती...?
पयलेच तं आपलं सरकार खुटीउपळ धंद्यात अन् सरकारी योजनेत ‘पाचर’ ठोकून त्या योजनेची ‘बंडी उलाय’चा हायहोल्टेज ड्रामा कराले येक नंबर तरबेज हाये!
By :
देशोन्नती डिजीटल »
•