कारंजा(Washim):- मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर सुरू असलेली अपघाताची मालिका थांबायचे नाव घेत नसतानाच शनिवारी 16 जून रोजी पहाटे साडे 3 वाजताचे दरम्यान पुन्हा कार अपघात (accident)घडला. या घटनेत एक जण जखमी झाला. बन्सीधर रामरतन उपाध्याय वय 74 वर्ष असे या कार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते कारंजा येथील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वन्यप्राणी आडवा आल्याने घडला अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार एम. एच. 37 ए. डी. 5731 क्रमांकाच्या कारने तिघेजण नागपूरहून कारंजा येथे येत असताना मार्गातील लोकेशन 164 वर भरधाव कारच्या वन्यप्राणी आडवा आला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्ता दुभाजकावर(divisor) धडकली त्यामुळे हा अपघात घडला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच विधाता चव्हाण व डॉ. भास्कर राठोड यांनी जखमीला प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात(hospital) दाखल केले. तेथील उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.