समुद्रपूर (Samudrapur) : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय (Agriculture Officer’s Office) गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी इमारतीत कार्यरत आहे. घर मालकाचे नऊ महिन्यापासूनचे भाडे न दिल्याने घरमालकाने कुलुप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यावर कोणतेही समाधान व कार्यवाही (Proceeding) नझाल्याने अखेर आज (ता. 20) शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घरमालक सुधिर खडसे यांनी इमारतीला कुलुप लावले.
आमदार समिर कुणावार व कृषी अधिकारी यांच्या मध्यस्थीने आश्वासनानंतर १० मीनिटाने उघडले कुलुप
त्यानंतर लगेच आमदार समिर कुणावार (MLA Sameer Kunawar) यांना भ्रमणध्वनी द्वारे याची माहीती मिळताच त्यांनी तत्काळ कृषी अधिकारी शंकर टोटावार (Agriculture Officer Shankar Totawar) वर्धा यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या मध्यस्थीने आश्वासनानतर कुलूप उघडण्यात आले. त्यावेळेस थकलेले भाडे लवकरात लवकर देण्याची ग्वाही यावेळी सुधीर खडसे यांना देण्यात आली. त्यानंतरच खडसे यांनी कार्यालयाचे कुलुप उघडून दिले.