परभणी(Parbhani) :- स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने बुधवार ४ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास राहटी येथील पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणार्यांवर कारवाई केली. या कारवाईत टिप्पर, जेसीबी(JCB) यंत्र मिळून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पोनि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनात सपोनि. पांडुरंग भारती, राजू मुत्तेपोड, पोउपनि. चंदनसिंग परिहार, पोलीस अंमलदार रवि जाधव, रंगनाथ दुधाटे, सुर्यकांत फड, शेख रफिक, हनवते यांच्या पथकाने कारवाई केली. यामध्ये एम.एच. ०४ ई.एल.१४८६ या क्रमांकाचा टिप्पर, एम.एच. ४० सी.एच.३४६३ या क्रमाकांचा जेसीबी जप्त केला आहे. सदर प्रकरणी मच्छींद्र उरटवाड, तेजस कांबळे, राजू रणवीर, हनुमान खुळे, मुंजाजी कुसळे यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाली आहे. पूर्णा नदीपात्रातून अवैध रित्या चोरट्या मार्गाने वाळुचा उपसा केला जात होता.