वाळू माफिया एम. पी. डी. ए. अॅक्ट प्रकरणातील दुसरा आरोपीला अटक
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Sand Mafia) : जिल्ह्यात रेती माफियांनी मोठया प्रमाणावर हौदास घातल्याने एम. पी. डी. ए. अॅक्ट मध्ये एका डिग्रस येथील एका वाघाला एका वर्षासाठी अकोला जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते. लगेच दुसरा (Sand Mafia) वाळू माफिया वाघ याला अंढेरा पोलिसांनी अटक केली होती. मात्र (Chikhali Police) पोलिसांना चकमा देत तो (Chikhali Police) पोलीस स्टेशन मधून फरार झाला. मात्र त्याचा पाठलाग करीत अखेर त्याच्या जालना येथे मुसक्या आवळल्या. त्यामुळे वाळू माफिया मध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे.
पाठलाग करत जालनामध्ये मुसक्या आवळल्या
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे मही खडकपूर्णा नदी पत्रातून मोठया प्रमाणावर (Sand Mafia) वाळू माफियां हे कोणालाही न जुमानता रात्रभर (Illegal sand) अवैध वाळूची वाहतूक करतात . याबाबत पोलीस प्रशासान, महसुल प्रशासन यांनी अनेक वेळा कार्यवाही करूण गुन्हे दाखल केले मात्र उलट वाळू माफिया अधिकारी कर्मचाऱ्यासर जीवघेणे हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली आहे त्यामुळे या (Sand Mafia) वाळू माफियांच्या नांग्या ठेचण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेवून पो.स्टे. अंढेरा अंतर्गत येणाऱ्या वाळु माफिया मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ, वय ३५ वर्ष, रा. डिग्रस ता.देउळगांव राजा जि. बुलढाणा यास एम. पी. डी. ए. अॅक्ट अन्वये प्रमाणे एक वर्षाकरीता अकोला जेलमध्ये स्थानबध्द करण्यात आले होते . आणि आनखी दहा वाळू माफियावर (Chikhali Police) पोलिसांची करडी नजर होती. पण दुसरा नंबर कोणाचा लागणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते अनेकांवर वाळू चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याने आठ ते दहा (Sand Mafia) वाळू माफियांनी आप आपले गाव सोडून फरार आणि न्यायालयात धाव घेतली होती.
आता आपल्याकडे (Chikhali Police) पोलीस दुर्लक्ष करतील या आशेपोती त्यांनी पुन्हा अवैध रेती वाहतूक सुरू केली होती. याच धावपळीत अंढेरा पोलीसांनी वाळू माफिया वर पाळत ठेवून माऊली वाघ रा डिग्रस या वाळू माफियाच्या मुसक्या आवळत अटक केली होती परंतु या आरोपीने (Chikhali Police) पोलिसांना चकमा देत पोलीस स्टेशन मधून फरार झाला . त्यामुळे ठाणेदार विकास पाटील यांनी आपली गुपित सूत्रे फिरवीत फरार वाळू माफियाला ताब्यात घेण्यासाठी पोहेकॉ कैलास उगले, सिध्दार्थ सोनकांबळे यांच्यावर जबाबदारी दिली या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग करीत जालना येथे जावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे एक मुन्ना वाघ अकोला जेलमध्ये स्थानबद्ध तर दुसरा अंढेरा पोलसच्या जाळ्यात सापडल्याने वाळू माफिया मध्ये चांगलीच धावपळ उडाली आहे. आता आनखी (Sand Mafia) वाळू माफिया लवकरच जेलची हवा खाणार असल्याचे सांगीतले जात आहे.