चिखली (Buldhana):- जिल्ह्यात रेती उपसा बंद असतांनाही वाळू माफिया (Sand Mafia) हे कोणालाही न जुमानता खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर रात्रीला अवैध वाळू (Illegal sand) वाहतूक करतात. याबाबत पोलीस प्रशासान, महसुल प्रशासन यांनी अनेक वेळा कार्यवाही करूण गुन्हे दाखल केले. मात्र उलट वाळू माफिया अधिकारी कर्मचाऱ्यासर जीवघेणे हल्ले करून मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या वाळू माफियांच्या नांग्या ठेचण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेवून पो.स्टे. अंढेरा अंतर्गत येणाऱ्या वाळु माफिया मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ, वय ३५ वर्ष, रा. डिग्रस ता.देउळगांव राजा जि. बुलढाणा यास एम. पी. डी. ए. ऍक्ट अन्वये प्रमाणे एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात केले.
पहिलीच कार्यवाही झाल्यानें अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असुन मोठी खळबळ उडाली आहे
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन (police station)अंतर्गत येणाऱ्या दे मही येथे सर्वात मोठा खडकपुर्णा नदीचे पात्र आहे. या नदी पात्रातून वाळू माफिया हे कोणालाही न घाबरता अवैधरीत्या वाळु चोरी करुन वाहतुक करणे, शासकीय कर्मचारी यांचेवर हल्ला करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण करणे व इतर असे प्रकार करून अवैध रेतीची वाहतूक करतात. त्यामुळे या वाळू माफियावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही (Proceeding) सुध्दा करण्यात आली होती, परंतु त्यांचे वर त्याचा काहीच परिणाम होत नसे झालेला नव्हता. प्रतिबंधक कार्यवाही करून सुध्दा कायदयास काही जुमानत नसल्याने त्यांचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन त्याचे गुन्हेगारी कृत्यांला आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी त्यांस स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, बुलढाणा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच माहीती मिळवुन सदर व्यक्ती सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने त्यांस एक वर्षाकरीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश १ जुलै रोजी पारीत केला.
हि जिल्हयातील पहिली वाळु तस्करी
हि जिल्हयातील पहिली वाळु तस्करांवर केलेली कार्यवाही ठरत आहे. जिल्हादंडाधिकारी बुलढाणा यांचे आदेशावरून मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना शिवाजी वाघ याचा तात्काळ शोध घेवुन त्यांस सदरचा आदेश तामील करून त्यांस दिनांक २ जुलै रोजी जिल्हा कारागृह अकोला (Akola Jail )येथे स्थानबध्द केले. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पो.ना. संजय भुजबळ यांनी तसेच पो.स्टे. अंढेरा येथील सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोकॉ. गोरखनाथ राठोड यांनी परिश्रम घेतले.