परभणी/गंगाखेड (Sand smuggling) : तालुक्यातून (Gangakhed taluka) वाहणाऱ्या गोदावरी नदी (Godavari River) पात्रातील वाळू धक्क्यांचे लिलाव झालेले नसतांना ही वाळू माफियांनी गोदावरी नदी पात्रात धारासुर पासून ते मसल्यापर्यंत उच्छांद घालत राजरोसपणे ट्रॅक्टर, टिप्परच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची वाळू चोरून नेत तालुक्यातील धारासुर पासून ते मसल्यापर्यंतचे गोदावरी नदी पात्र ओरबाडले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे असे असतानासुद्धा (Revenue Administration) महसूल प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने तालुका वासीयांतून संताप व्यक्त केल्या असून शासनाने सुरू केलेल्या शासकीय वाळू धक्क्यावरून वाळू खरेदी करण्यासाठी ऑनलाईन बुकींग होत नसल्याने या धक्क्यावरुन सामान्यांना मात्र शासकीय दरात वाळूच मिळत नसल्याने वाळूमुळे तालुक्यातील अनेक घरकुलांचे बांधकाम रखडल्याचे दिसत आहे.
गोदावरी नदी पात्रातून कोट्यावधी रुपयांची हजारो ब्रास वाळूची चोरी
गंगाखेड तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील वाळूला मोठी मागणी असल्यामुळे गोदावरी नदी काठावर असलेल्या तालुक्यातील धारासुर शिवारातील खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूच्या मैराळसावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, आनंदवाडी, महातपुरी, दुस्सलगाव, मुळी, धारखेड, गंगाखेड शहर, झोला, पिंप्री, मसला, नागठाणा आदी गावात वाळूचे धक्के निर्माण झालेले आहेत. मात्र पर्यावरण विभागाच्या अटींमुळे गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील एकही वाळू धक्क्याचा लिलाव झालेला नाही. असे असताना सुद्धा खडका बंधाऱ्याच्या खालील बाजूने पायथ्याला असलेले वाळूंचे थर पाहून धारासुर, मैराळसावंगी, गौंडगाव परिसरातील (Sand Mafia) वाळू माफियांनी ट्रॅक्टर व टिप्परच्या रात्री अपरात्री विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा करून कोट्यावधी रुपयांची हजारो ब्रास वाळू चोरून नेल्याचे दिसत आहे. याचप्रमाणे चिंचटाकळी, आनंदवाडी, खळी, महातपुरी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून ही रात्री तसेच दिवसा चोरून वाळू उपसा केला जात आहे.
शासकीय वाळू धक्क्यावरुन सामान्यांना मिळत नाही वाळू
दुस्साल गाव शिवारातील मुळी बंधाऱ्याच्या आतील बाजूने गदर्भ व बैल गाडीच्या सहाय्याने (Sand Mafia) वाळू उपसा होत आहे. (Gangakhed taluka) गंगाखेड शहरालगतच्या धारखेड शिवार व रेल्वे पुलाखालील बाजूने ट्रॅक्टर ने मोठ्या प्रमाणात विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. झोला, पिंप्री तसेच मसला येथील गोदावरी नदी पात्रातून ट्रॅक्टर व हायवा या वाहनांच्या सहाय्याने वाळू उपसा होत आहे. या वाळू उपस्यामुळे वाळू माफियांत मसला या गावात दरदिवशी काही ना काही कारणाने वाद होत असल्याने या वादाच्या घटनांना मसला ग्रामस्थ चांगलेच वैतागले आहेत.
गाळ मिश्रित वाळूच्या नावाखाली एक नंबरी वाळूचा उपसा
तालुक्यातील (Gangakhed taluka) घरकुल धारकांसह सर्व सामान्य नागरिकाला स्वस्त दरात वाळू खरेदी करता यावी. यासाठी (Revenue Administration) शासनाने धारासुर शिवारातील खडका बंधाऱ्यातून व मैराळसावंगी शिवारातील गोदावरी नदी पात्रातून गाळ मिश्रित वाळू उपसा करून ऑनलाईन बुकींग करणाऱ्या नागरिकांना स्वस्त दरात (Sand Mafia) वाळू उपलब्ध करून देण्यासाठी दोन शासकीय वाळू धक्के तयार केले आहे. मात्र ऑनलाईन बुकींग होत नसल्याने येथे सामन्यांना वाळू मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
बुकिंगसाठी शेकडो सिमकार्डचा उपयोग
तालुक्यातील (Gangakhed taluka) मैराळसावंगी व धारासुर येथील गोदावरी नदी पात्रातील वाळू धक्क्यावर ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरच वाळू मिळणार असल्याने घरकुल धारकांसह वाळूची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांची अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा ऑनलाईन बुकींग होत नसली. मात्र वाळू धक्का घेणाऱ्यांनी मात्र बनावट व्यक्तींच्या नावे ऑनलाईन वाळू बुकिंग करण्यासाठी मोबाईलचे शेकडो सिमकार्ड घेवून त्या माध्यमातून वाळू बुक केल्याचा व बुकींग ओटीपी मिळताच सिमकार्ड तोडून निष्क्रिय करून फेकून दिल्या जात असल्याचे बोलून दाखविल्या जात आहे.
डेपोवर वाळू साठा नाही
गोदावरी नदी पात्रातून काढलेल्या गाळ मिश्रित वाळूचा साठा नेमून दिलेल्या डेपोवर करणे आवश्यक असताना सुद्धा या डेपोवर वाळू साठा न करताच गोदावरी नदी काठावरून चढ्या दरात वाळूची थेट विक्री केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे.
गावाबाहेर मोकळ्या जागेत किंवा रस्त्यालगत अवैध वाळू साठे
शासकीय वाळू धक्क्यावर (Godavari River) नदी पात्रातील पाण्यातून काढलेल्या (Sand Mafia) वाळूचा साठा डेपोवर न करता रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावाबाहेर तसेच रस्त्याच्या बाजूला वाळू साठा करून त्याची जादा दरात काळ्या बाजारात विक्री केल्या जात आहे. मैराळसावंगी येथील वाळू धक्का बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी या वाळू धक्क्यावरून सुद्धा ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांना वाळू पुरविण्या ऐवजी वाळूची थेट काळ्या बाजारात विक्री केल्या जात असल्याचे या परिसरातील ग्रामस्थांतून बोलल्या जात आहे.
महसूल तसेच पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
गंगाखेड तालुक्यातून (Gangakhed taluka) वाहणाऱ्या गोदावरी नदी (Godavari River) पात्रातील वाळू रात्रंदिवस विनापरवाना अवैधरित्या उपसा व वाहतूक करून चढ्या दराने वाळूची विक्री होत असताना सुद्धा महसूल व पोलीस प्रशासन मात्र याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत चिरीमिरी घेवून वाळू उपसा व वाहतुकीसाठी मुकसंमंती देत असल्याने महसूल (Revenue Administration) व पोलीस प्रशासनाच्या (Gangakhed Police) कार्यशैलीवर तालुका वासीयांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बैठे पथक स्थापन करून कार्यवाही करणार
गंगाखेड तालुक्यात (Gangakhed taluka) ठीक ठिकाणावरून गोदावरी नदी (Godavari River) पात्रातून होत असलेल्या विनापरवाना अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूकीसंदर्भात माहिती घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्याशी संपर्क साधला असता (Sand Mafia) वाळू चोरी रोखण्यासाठी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांचे बैठे पथक स्थापन करून वाळू चोरीवर लक्ष ठेवत विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कार्यवाही करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले.