धनगर टाकळी शिवारात विशेष पथकाची कारवाई दिड लाखाचा मुद्देमाल जप्त!
परभणी (Sand Smugling) : परभणीच्या चुडावा येथे तराफ्याव्दारे गोदावरी नदी पात्रातुन होत असलेल्या वाळू उपशावर पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवार 4 जुलै रोजी कारवाई केली. धनगर टाकळी शिवारात केलेल्या कारवाईत दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of Goods) करण्यात आला आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!
पोलिसांचे विशेष पथक अवैध धंद्याची (Illegal Business) माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला धनगर टाकळी शिवारात गोदावरी नदी पात्रातुन तराफ्याच्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. यावरुन पथकाने कारवाई करत तराफा, इंजिन व इतर साहित्य मिळून दिड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच नदी पात्रातुन उपसा केलेली तीन ब्रास वाळू पुन्हा नदी पात्रात ढकलुन दिली. सदर प्रकरणी पोउपनि. शकुंतला डुकरे यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर रौंदळे याच्यावर चुडावा पोलिस ठाण्यात (Chudava Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुखेडकर करत आहेत.




