परभणी (Sand Smuggling) : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवार 10 मे रोजी सकाळी अवैध वाळू वाहतूकीचा हायवा पकडून गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या विशेष पथकातील सपोनि रामकिशन नांदगावकर, सपोउपनि. अब्दुल रियाज, जमादार विशाल लाड, स. शफिक, मोहमद अबूजर आदी गंगाखेड शहरातील दत्त मंदिर परिसरात आले असता, भुजबळ सावंगी येथून वाळूने भरलेला हायवा (Hiwa) येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने या परिसरातील पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून शनिवार रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आलेल्या, वाळूच्या हायवाला थांबवून चालक विशाल खटिंग याच्याकडे वाळू वाहतूकीच्या (Sand Transporter) परवान्याची विचारणा केली असता, त्याने परवाना नाही. असे सांगताच, विशेष पथकातील पोलीसांनी वाळूने भरलेला हायवा पोलीस ठाण्यात (Police Station) जमा करून 15 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत हायवा चालक व मालक यांच्या विरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगनवाड करीत आहेत.
Sand Smuggling: परभणीत अवैध वाळू वाहतूकीचा हायवा पकडला!

You Might Also Like
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics