पुसद मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील वाढदिवस उत्साहात साजरा
पुसद (Manoj Jarange Patil) : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करणारे संघर्ष योद्धा (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस पुसद मध्ये दि. 1 ऑगस्ट रोजी येथील सखल (Maratha community) मराठा समाजाच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तुषार अर्बन कॉपरेटिव बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष एड. आशिष पंजाबराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
वृक्षरोपण व दिव्यांग व अनाथ असलेल्या गरजूंना एक महिना पुरेल एवढा शिधा देण्याबरोबरच पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपन करुन समाजात सकल मराठा समाजाने एक वेगळा आदर्श निर्माण केल्याचे मत इंडियन बार कौन्सीलचे सदस्य अॅड.आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ते पुसद येथील सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रे लेआऊट मधील छत्रपती उद्यानात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलत होते.
सुरवातीला अॅड.आशिष देशमुख,पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद,जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष शुभांगी पानपट्टे,सुशांत महल्ले आदींनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.सकल मराठा समाजाने शरद मैंद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत ठरल्यानुसार मनोज जरांगे यांचा वाढदिवस डिजे लावून व केक न कापता समाजशील उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले होते.व त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च शरद मैंद यांनी उचलला.
त्यानुसार तब्बल दोन ते तीन वर्षांची व तब्बल सात ते दहा फुट ऊंचीची पूर्ण वाढ झालेली आंबे,चिकू,पेरु,फणस,सिताफळ आदी फळझाडांची तसेच बेल, वड,पिंपळ आदी पर्यावरणपूरक रोपे स्वखर्चाने आणून पत्रे ले आऊटमधील छत्रपती उद्यानात लावली तसेच सुमित नर्सरीचे संचालक प्रभाकर टेटर यांनी दिलेली रोपे श्रीरामपूरातील विविध मंदीरे,ओपन स्पेस असलेल्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत लावले . यावेळी शिवाजी कदम, नितीन पवार,गणेश पावडे, दीपक जाधव, किरण देशमुख सवनेकर,यशवंत देशमुख, दिलीप पाटील कान्हेकर, संभाजी टेटर, पंजाब वानखेडे, चंद्रशेखर देशमुख, प्रवीण कदम, सोनू पाटील, हरगोविंद कदम, बंडू पारटकर,प्रभाकर टेटर, चक्रधर मुळे,देविदास देवसरकर, अविनाश अडकिने,अॅड. गजानन देशमुख, करण ढेकळे,अभिजीत पानपट्टे , पंडित देशमुख कान्हेकर, गुणवंत ठेंगे, सोनू पाटील,चंद्रकांत ठेंगे,शशिकांत जामगडे यांचेसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..यानंतर काकडदाती येथील दिव्यांग व अनाथांना पुरेल एवढा तब्बल वीस हजार रुपयांचा किराणा शरद मैंद यांच्या देण्यात आला.संचालन व आभार प्रदर्शन चंद्रकात ठेंगे यांनी केले.