SANGLI :- नागपूर – रत्नागिरी महामार्गाच्या जमीन संपादन आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या महामार्गा विरोधात स्वाभिमानीशेतकरी संघटनेकडून कोल्हापूरच्या उदगाव या ठिकाणी सांगली कोल्हापूर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांनी बळाचा वापर करत रस्ता रोको काढला मोडीत
शेतकरी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह महिला आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संपादित करणाऱ्या जमिनीचा चौपट मोबदला द्यावा आणि कृष्णा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे पिलर वाढवण्यात यावे, या मागणीसाठी राजू शेट्टींनी (Raju Shetti) सांगली-कोल्हापूर महामार्ग बेमुदत रोखण्याचा इशारा दिला होता. नगर सकाळी तर राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यामुळे रस्ता रोको होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांनी सांगली-कोल्हापूर महामार्गावर (Sangli-Kolhapur highway) उदगाव येथे रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करत केला परंतू आंदोलन पोलिसांनी मोडीत काढले.