बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा व बुलढाणा या दोन तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना वर्ष 2023 24 मध्ये प्रधानमंत्री (Crop insurance) पिक विमा योजना चा लाभ मिळाला नाही तरी सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ पिक विमा रक्कम अदा करण्यात यावी तथा पिक विमा कंपन्यांना या संदर्भात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल, असे निर्देश देण्याची मागणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पत्र देऊन केली आहे.
आ. संजय गायकवाड यांची कृषी मंत्र्यांकडे मागणी!
सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा व मोताळा या दोन तालुक्यात वर्ष 2023-24 मध्ये एकूण 33 हजार 873 शेतकऱ्यांनी (Crop insurance) पिक विमा भरला होता. दरम्यान नुकसान झाल्यानंतर 22 हजार 678 शेतकऱ्यांनी तक्रारी नोंदवल्या होत्या मात्र यापैकी केवळ 1428 तक्रारी या ग्राह्य धरण्यात आल्या तर काढणीपश्चात १९०७ तक्रारीपैकी 183 तक्रारी नुकसानीस पात्र जाहीर करण्यात आल्या.
पिक विमा (Crop insurance) एरिया अप्रोच अंतर्गत 1232 शेतकऱ्यांचे 242.99 लक्ष काडणी पश्चत नुकसानीचे 158 शेतकऱ्यांचे 42.9 लक्ष एरिया अप्रोच अंतर्गत 12 32 शेतकऱ्यांचे 45.04 असे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एकूण 2676 शेतकऱ्यांचे खात्यामध्ये तत्काळ रक्कम जमा करण्यासंदर्भात आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावे तसेच स्थानिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान अंतर्गत 22678 व 1907 नोंदविण्यात आलेल्या तक्रारीपैकी एकवीस हजार दोनशे पन्नास स्थानिक आपत्तीच्या व १७२४ कडणी पश्चात तक्रारी विमा कन्या कंपन्याकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत. (Crop insurance) पिक विमा कंपनीचे जिल्हा तसेच तालुका स्तरावर असलेल्या कार्यालयात मनुष्यबळ ही अपुरे आहे या कार्यालयात मनुष्यबळ बळकटीकरण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून प्राप्त तक्रारीचा लवकरात लवकर करण्यात येईल व याचा लाभ शेतकऱ्यांना होईल या प्रकरणे पिक विमा कंपन्यास तात्काळ निर्देश देण्यात यावे, अशी मागणी आ. संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली आहे