कार्यकर्त्याचे नेत्याशी असेही रक्ताचे नाते…
बुलढाणा (Sanjay Gaikwad) : नेत्यांसाठी अनेक कार्यकर्ते अनेक वेळा काही-काही करताना दिसतात. कुणी पायी वारी करते, कुणी चप्पल घालत नाही ते कोणी लोटांगण घालत जातात. साधारणत: हे प्रकार निवडणूक जिंकून येण्यासाठी केलेले नवस असतात. परंतु सध्या कोणतीही निवडणूक नसताना बुलढाण्यातील एका कार्यकर्त्याने, आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) व त्यांची मृत्युंजय भैया व पृथ्वीराज भैय्या या दोन मुलांचे चित्र रेखाटण्यासाठी वापरलेली स्वतःचे रक्त. नेत्याशी असलेल्या एका कार्यकर्त्याच्या याच रक्ताच्या नात्याची त्यामुळे शहरात चर्चा आहे !
धर्मवीर युथ फाउंडेशनचा (Dharmaveer Foundation) सदस्य असलेल्या कार्तिक पवार या युवकाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड (Sanjay Gaikwad), युवानेते मृत्युंजयभैया गायकवाड (Mrityunjay Gaikwad) व धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराजभैय्या गायकवाड (Prithviraj Gaikwad) यांचे एकत्रित असलेला फोटो स्वतःच्या रक्ताची प्रेम गिफ्ट केली, हे छायाचित्र रेखाटण्याचे काम बुलढाणा येथील टिल्लू गोरले या कलाकाराने केले आहे !