आ. संजय गायकवाड यांची संकल्पना !
बुलढाणा (Sanjay Gaikwad) : बुलढाणा जिल्ह्यातील गरीब शेतकरी मजूर यांच्या के.जी. ते पी.जी. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास व भोजनाची सोय व्हावी, यासाठी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या संकल्पनेतून लवकरच अत्याधुनिक वसतीगृह साकार होणार आहे. सदरचे वसतीगृह हे नगरपालिका अंतर्गत निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात प्रथमच एखाद्या नगरपालिकेअंतर्गत होणारे हे पहिलेच वसतीगृह असल्याने सदर विषय चर्चेचा बनला आहे!
महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिका अंतर्गत निर्माण होणार वसतीगृह
बुलढाणा विधानसभा (Buldhana Assembly) मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला आहे मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या व विषय त्यांनी मार्गी लावले आहेत बुलढाणा सारख्या ठिकाणी त्यांनी कृषी महाविद्यालय, तसेच नगरपालिकांच्या शाळा या सीबीएससी पॅटर्न मध्ये सुरू करून दाखविले आहे. त्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख एज्युकेशन हब अशी होत आहे. बुलढाण्यात आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून अठरापगड जातीच्या मुलांसाठी नर्सरी केजी ते केजी टू व सीबीएससी याचे शिक्षण सुरू केले आहे, परंतु ग्रामीण भागातील जनतेला या शिक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे इच्छा असून सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थी सदर सीबीएससी शाळेचा लाभ घेऊ शकत नव्हते.
बुलढाणा शहरात विशिष्ट समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था आहे, मात्र ते नादुरुस्त व अपूर्ण असल्याने अनेक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकत नव्हते. सदर विषयाचे गांभीर्य पाहता आमदार संजय गायकवाड यांनी हा विषय देखील मार्गी लावण्याचा चंगच बांधला आहे. त्या अनुषंगाने आ. गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषद वितरित केलेल्या जाणाऱ्या निधीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या जुन्या आणि वितरण जागेजवळ तीन कोटी रुपयांच्या वसतीगृहास मंजुरात मिळून दिली आहे. याठिकाणी मुला-मुलींकरिता सदरचे वस्तीगृह उभे राहणार आहे. सदर कामासाठी विविध टप्प्यात तब्बल 6 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहे. या निधीतून अत्याधुनिक वसतीगृह उभे राहणार असून, सदर वसतीगृहाचा लाभ विद्यार्थ्यांना पुढील सत्रापासून घेता येणार आहे. अशा प्रकारचे वसतीगृह बांधणारी बुलढाणा ही महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका असल्याने चर्चा होत आहे.