देऊळगाव राजा (Dr. Rajendra Shingane) : जनतेचे कामे सुकर व्हावे,, यासाठी तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) साहेब यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विधवा, दिव्यांग व श्रावणबाळ योजनेतील निराधारासाठी महत्त्वपूर्ण समजली जाणारी संजय गांधी निराधार योजनेचे जबाबदारी माझ्यासह अन्य पदाधिकाऱ्यावर सोपवले आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक निराधारांना आधार देण्याचं काम डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांच्या माध्यमातून झालं. या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून झालं असल्याचं काम राष्ट्रवादीचे युवानेते तथा माजी सरपंच गजानन चेके यांनी बोलताना सांगितले.
शासकीय कार्यालयामध्ये सामान्य जनतेचे विविध कामे बऱ्याच काळापर्यंत प्रलंबित असतात काम करायचे असेलतर, पूर्ण दिवस वाया घालवावा लागतो.. अशीच इतरही कामे करायचे असल्यास दैनंदिन उपजीवी केस साठी करावे लागणाऱ्या कामावर त्याचा परिणाम होतो मी सामान्यांची परवड थांबविण्यासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय सामाजिक सभागृह या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे असणारे फलक लावण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या माध्यमातून तालुक्यातील अनेक शेकडो आबाल वृद्धांना या योजनेतून लाभ मिळाला त्यामुळे खऱ्या अर्थाने आज या योजनेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी केलं असून, शासकीय योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचल्या पाहिजे, यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. याच बरोबर अपंग व्यक्तिना इलेक्टिक सायकल वाटप, ज्याना कानाने ऐंकु येत नसणाऱ्यांना श्रवण यंत्र वाटप, कामगार कल्याण योजनेतून कामगारांना पेटी असेल, शेतकऱ्यांना फवारणी पंप, अपंग प्रमाणपत्राचे वाटप, वृद्ध कलावंता दरमहा मानधन, रोजगार मेळावे,राष्ट्रीय कुटुंब योजना लाभ, शेतकर्याना विज पुरवठा सुरळित होण्यासाठी नविन विध्दुत जोडणी, नवीन डिपी, नविन फिटर,असे अनेक कामे, शादीखाने, सिमेट रस्ते सिमेट नाल्या डाबरी रस्ते पुल सामाजिक सभागृह स्मशानभुमी पालकमंत्री पादण रास्ते पाणी पुरवठा योजना विध्दुत खांब अतिवृष्टि अनुदान शाळाखोल्या अशा असंख्य योजनेतुन लोकाना सुविधा देण्याचे शिगणे साहेबांनी केले. त्यामुळे या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा ठाम विश्वास यावेळी गजानन चेके यांनी व्यक्त केला. यावेळी राजू चित्ते, बबन माटे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.