आयुषच्या विद्यार्थ्यांवर लादलेली नेक्स्ट परीक्षा रद्द करण्याची मागणी
परभणी (Sanjay Jadhav) : बीएएमएस, बीयूएमएस, बिएचएमएस, आयुष विद्यार्थ्यांना कुठलीही पूर्व कल्पना न देता त्यांच्यावर लादण्यात आलेली (NEXT exam) नेक्स्ट परीक्षा रद्द करण्यासाठी लोकसभेत प्रश्न उचलणार असल्याचे आश्वासन परभणी लोकसभेचे खा. संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी विद्यार्थ्यांना दिले. आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि एनसीआयएसएम कॉन्सीलद्वारे बीएएमएस, बीयुएमएसच्या विद्यार्थ्यांना २० डिसेंबर २०२३ पासून अचानक नेक्स्ट परीक्षा (NEXT exam) लागू करण्याचे जाहिर करण्यात आले. त्यानूसार ज्या विद्यार्थ्यांचे इंटर्नशीप संकूले आहे किंवा त्यांनी इंटर्नशीपला सुरूवात झाली आहे. त्यांच्यासाठी नेक्स्ट परीक्षा लागू असणार नाही.
मात्र २० डिसेंबर २०२३ च्यानंतर जे विद्यार्थी इंटर्नशीप करणार आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली. २०१५ ते २०२३ या कालावधीतील ५ लाखांपेक्षा जास्त आयूष विद्यार्थी मानसीक तणावातून जात आहे. त्यांच्यावर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला असतांना त्यांच्यावर लादलेली नेक्स्ट परीक्षा रद्य करणे आवश्यक असल्याचे खा. संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी आयूष मंत्रालयाचे मंत्री यांना पत्राद्वारे कळविले आहे. तसेच लोकसभेत डॉक्टरांचा प्रश्न मांडणार असल्याचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे. यावेळी विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रवादीचे युवानेते रितेश काळे उपस्थित होते.