खा. संजय उर्फ बंडू जाधव यांचे प्रतिपादन
परभणी/गंगाखेड (Sanjay Jadhav) : मतदार संघातील सर्वसामान्य मतदार, नागरिकांसह व्यापारी व शेतकरी बांधवांवर होणारा अन्याय कदापी सहन करणार नसल्याची ग्वाही देत जिथे अन्याय तिथे मी उभा असल्याचे अभिवचन परभणी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित (Sanjay Jadhav) खा. संजय उर्फ बंडु जाधव यांनी दि. ५ जून बुधवार रोजी सायंकाळी ७ वाजता (Gangakhed Election) गंगाखेड शहरात आयोजीत केलेल्या विजयी मिरवणूक व जाहीर आभार सभेत बोलताना केले.
गंगाखेड शहरातील मुख्य रस्त्याने काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर आयोजीत करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेप्रसंगी माजी आ. सिताराम घनदाट मामा, रिपाईचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, रिपाईचे धम्मानंद घोबाळे, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल्ल अश्फाक भाई, प्रमोद मस्के, एकबाल चाऊस, अतुल सरोदे, गोविंदा आय्या, सखुबाई लटपटे, मनोहर महाराज केंद्रे, काँग्रेसचे प्रणित खजें, ॲड. नंदकुमार काकाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जमीर, ॲड. मनोज काकाणी, शिवसेना तालुकाप्रमुख अनिल सातपुते, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनूस, गिरीश सोळंके, सय्यद इस्माईल, गोटु मुंडे, समाजवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष शेख उस्मान, हभप रोहिदास महाराज मस्के, बालासाहेब राखे, रजत गायकवाड, गोविंद जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. संजय जाधव (Sanjay Jadhav) म्हणाले की इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ची नोटीस देऊन दुसऱ्या पक्षातील माणसं फोडून आपल्या पक्षात घेत त्यांच्या जिवावर राजकारणाची पोळी भाजनाऱ्याना मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली. गंगाखेड विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधीमुळे दादागिरी, दडपशाही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा आरोप करत कोणत्या ना कोणत्या कारणाने गावगुंडाकरवी येथील सर्वसामान्य मतदार, नागरिक, व्यापारी व शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे सांगून खा. जाधव यांनी स्थानिक आमदाराचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवत (Gangakhed Police) गंगाखेड परिसरातील गावगुंडाना पोलीसांनी वेळीच आवर घालावा अशी विनंती करत समाजासाठी घातक असलेल्या लोकांना नीट करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असल्याचे सांगत कोणी कोणाची मुस्कटदाबी करून जागा, शेत जमीन सारखी मालमत्ता हिसकावण्याच्या प्रयत्न करून अन्याय करत असेल तर तो मी कदापी सहन करणार नसल्याचा इशारा देत, जिथे अन्याय तिथे मी उभा असल्याचे अभिवचन देत अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद ठेवा मी तुमच्या सोबत असल्याचे खा. जाधव (Sanjay Jadhav) यांनी सांगितले.
प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सालगड्यासारखे वागू नये: माजी आ. घनदाट मामा
गंगाखेड (Gangakhed Election) विधानसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी स्वतःसाठी दादागिरी करत असल्याचा आरोप करून मतदार संघातील वाढती दादागिरी निपटून काढण्याची जबाबदारी खासदार साहेब तुमच्यावर आहे, असे म्हणत येथील हुकूमशाहीला नष्ट करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनीधीच्या सालगड्यासारखे वागू नये असे, आवाहन यावेळी बोलताना माजी आमदार सिताराम घनदाट मामा यांनी केले.