कृषिमंत्री झालेल्या बैठकीनंतर आ. संजय कुटे यांची माहिती
बुलढाणा (Sanjay Kute) : बुलढाणा जिल्ह्याच्या पिकविमा व फळपिक विमा योजना (Crop Insurance) अनुदाना बाबत आणि अंमलबजवानी बाबत आ. डॉ. संजय कुटे (Sanjay Kute) यांच्या उपस्थितित राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या दालनात आज गुरुवार 20 जून रोजी बैठक पार पड़ली असून, त्यात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामधे सन 2023-24 च्या खरिप पिकविम्याचा अतिशय महत्वाचा विषय मार्गी लागला असुन या महिन्याच्या शेवटी शेवटी खरीप पिकविमाची 118 कोटिंची रक्कम ही बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे पिकविमा कंपनीने मान्य केले आहे. त्यामुळे खरीप पिकविमा मिळन्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच बरोबर तसेच संत्रा मृगबहार फळपिक विमा योजने (Crop Insurance) अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याना नुकसान भरपाईपोटी तब्बल 6 कोटि 47 लक्ष रूपये इतका निधी मंजुर असुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती आ. कुटे (Sanjay Kute) यांनी दिली आहे.
आ. संजय कुटे (Sanjay Kute) यांच्या जनसंपर्क कार्यालयातून काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील 113 शेतकरयांचे आधार नंबर पड़ताळनी सुरु असुन त्यांची 44 लक्ष रुपयाँची मदत ही ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर तत्काल दिल्या जाईल. अवकाळी पावसामुळे गहु, हरभरा या सारखी रब्बी पिके ख़राब झाली होती त्या वेळी अनेक शेतकरी बांधवांचे प्रस्ताव (Crop Insurance) विमा कंपनीने अपात्र केले होते. याबाबत सुद्धा बैठकित सकारात्मक चर्चा झाली असून सदर मदत मिळणे आवश्यक आहे, ही बाब आ. डॉ. कुटे यांनी मंत्री मुंडे (Dhananjay Munde) यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी ह्या विषयात लक्ष देऊन सकारात्मक मार्ग कडण्याच्या सुचना बैठकित अधिकारी वर्ग आणि पिकविमा कंपनीला देण्यात आल्या. तसेच पिकविमा कंपनीसुद्धा याबाबत सकरात्मक असुन यातून ही शेतकरी बांधवाना दिलासा मिळणार असल्याचे डॉ. कुटे (Sanjay Kute) यांनी सांगितले. तो मिळेपर्यंत मी या विषयाचा पाठपुरावा करणार असल्याचेही यावेळी ते बोलले.
जिल्ह्यातील ठिबक सिंचन अनुदान आणि यंत्रसामुग्री अनुदान गेल्या अनेक दिवसा पासून प्रलंबित आहे. याबाबतही बैठकित सविस्तर चर्चा करण्यात आली असून, सदर अनुदान तत्काळ देण्यात येईल, असा निर्णय झाला असुन अधिवेशना दरम्यान 10 जुलैपर्यंत हा विषय मार्गी लागूंन जिल्ह्यातील शेतकरयांचे 78 कोटी रूपये ठिबक सिंचन अनुदान आणि 3 कोटीपेक्षा जास्त यंत्रसामुग्रीचे अनुदान मिळन्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या बैठकिला कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे (Sanjay Kute), कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा कृषि अधीक्षक ढगे आणि पिकविमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. ज्या वेळी अतिवृष्टिमुळे, अवकाळी पावसामुळे ओला किंवा सूखा दुष्काळ, पिकविमा यामुळे माझा शेतकरी अडचणित सापडतो. त्या वेळी मी क्षणचाही विलांब न लावता राज्य सरकार च्या माध्यमातून शेतकरी बंधुना मदत कशी मिळेल याचा सा तत्यपुर्ण पाठपुरावा करीत असतो, असे यावेळी आ. डॉ. संजय कुटे (Sanjay Kute) म्हणाले.