बंजारा समाजात आनंदाचे वातावरण
मानोरा (Sanjay Rathod) : बहुजन व बंजारा समाजाची काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द विकास गेल्या अनेक वर्षापासून उपेक्षित होता, मात्र वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी पालकमंत्री पद स्विकारले तेव्हापासून पोहरादेवी व उमरी खुर्द विकासाला मोठया प्रमाणात गती मिळाली आहे.
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यांना वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री पद होते, तेंव्हापासून पोहरादेवीच्या विकासाला खरी चालना मिळाली आहे. सन २०१८ मध्ये धर्मगुरु संत डॉ. रामराव बापू यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस (Deputy CM Fadnavis) यांच्या हस्ते १०० कोटी रुपयाचे नगारा भवनाचे भूमिपूजन २०१८ मध्ये पार पड़ले. आज या नंगारा भवनाचे काम पूर्ण झाले असून येत्या ५ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे.
विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री फडणवीस (Deputy CM Fadnavis) यांच्याकडून १२ फेबुवारी २०२३ रोजी तिर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द विकासासाठी ५९३ कोटी रुपये पालकमंत्री ना संजय राठोड यांनी मंजर करून घेतले, त्यामध्ये १०३ कोटी रुपये तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील देवी जगदंबा माता मंदीर तसेच सदगुरू संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामराव बापू यांचे समाधी स्थळ व उमरी खुर्द येथील सामकी माता मंदीर व संत जेतालाल महाराज मंदिर यांचा समावेश आहे, भक्त निवास विकासासाठी ७६ कोटी व वन विभागाच्या अखत्यारीतील मोकळ्या जमिनीवर २०০ कोटी रुपयाचे बॉटनिकल गार्डन होणार असुन तीर्थक्षेत्र पोहरादेवी जोडणा्ऱ्या चारही रस्त्याचे नुतनीकरण होणार आहे.
१६६ कोटी रुपये नंगारा भवनाचे विकास काम पूर्णत्वास गेले आहे. बसस्थानक नव्याने मंजूर झाले असून नव्याने पोलीस स्टेशनची भव्य इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे पोहरादेवीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पालकमंत्री ना. संजय राठोड (Sanjay Rathod) यानी आकाक्षित जिल्हयासह अति मागासलेला मानोरा तालुक्यातील बहुजन व बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी येथे तिर्थ विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात ७२५ कोटी रुपयाचा निधी आतापर्यत मंजूर करून आणला असुन विकासाचे काम रात्र दिवस जलद गतीने सुरू आहे. तसेच नंगारा भवनाचे काम पूर्ण झाले असून येत्या पाच ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी तसेच उमरी तिर्थक्षेत्राचा कायापालट केल्याने बंजारा समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमरावती येथून विशेष हेलिकॉप्टरने शनिवारी पोहरादेवीत सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. पंतप्रधान दौरा निमीत्त सभा पाहणी करीता मुंबईवरून बुधवारी ( दि. २ ऑक्टोंबर ) रोजी मुंबईवरून प्रधान सचिव एकनाथ डवले, अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांनी बंजारा विरासत नंगारा वास्तू संग्रहालयाची मंदीर स्थळाची व सभा स्थळाची पाहणी केली.