मानोरा (Sanskriti Ade gold medal) : तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील कु. संस्कृती संदीप आडे (Sanskriti Ade) हिने सलग दुसऱ्याही वर्षी शारदा ज्ञानपीठ, मालाड मुंबई येथे प्रो. जिगोरो कानो इंटरनॅशनल मुंबई ज्युडो चॅम्पियनशिप २०२४ मध्ये झालेल्या आंतर शालेय ज्युडो स्पर्धेत १२ वर्षे वयोगट व ३६ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत (gold medal) सुवर्णं पदक प्राप्त केला आहे. त्यामुळे संस्कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील वर्षी सन २०२३ मध्ये सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत (gold medal) सुवर्ण पदक प्राप्त केले होते. त्यांनी या यशाचे श्रेय, तिचे क्रीडा प्रशिक्षक शिक्षक रविभूषण कदम, फैजान व तिचे आई वडील यांना दिले आहे. कु. संस्कृती आडे (Sanskriti Ade) यांचे वडील संदीप आडे हे तहसील कार्यालय मानोरा येथे निवासी नायब तहसीलदार म्हणुन कार्यरत आहे. आजच्या काळात मुलींना आत्मसंरक्षण हे खुप काळाची गरज आहे. असे संस्कृती आडे चे वडील यांनी सांगितले तसेच त्यांचे आजोबा मुकिंद आडे हे समाजसेवक म्हणून परिचित आहे.