पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप येथे श्री संत गजानन महाराज भव्य पारायण सोहळा संपन्न
अमरावती (Sant Gajanan Maharaj) : मकरसंक्रांती, नवीन वर्ष आणि जागतिक पारायण दिनाचे औचित्य साधून दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप, अमरावती येथील स्वामी विवेकानंद ऑडिटोरियममध्ये श्री संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) विजय ग्रंथ पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्रींच्या पालखीने सोहळ्याची सुरुवात झाली. पालखी व श्रींचे पूजन संस्थेचे अध्यक्ष मा. आ. श्री प्रवीण पोटे पाटील, सौ अनुराधाताई प्रवीण पोटे पाटील, उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री गजानन स्वामी चरित (Sant Gajanan Maharaj), जो नियमे वाचिल सत्य, त्याचे पुरतील मनोरथ… या हेतूने अमरावती शहरासह जिल्हातील सुमारे ५००० पेक्षा जास्त गजानन महाराज भक्तांनी व महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी या पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. मुखोदगत वाचक सौ. विद्याताई पडवळ (मुंबई) यांनी सुमधुर वाणीतून महाराजांना पारायण करीता आवाहन व त्यानंतर गजानन विजय ग्रंथ परायणाला सुरवात करण्यात आले. प्रत्येक अध्यायानंतर = विद्याताई पडवळ यांनी (Sant Gajanan Maharaj) गजानन महाराजांच्या अनुभवकथनाद्वारे प्रत्येक अध्यायानंतर उपस्थित भक्तांना भावनिक अनुभव दिला. पारायणाच्या सुरुवातीला सर्व भक्तांना गजानन विजय ग्रंथ प्रदान करण्यात आले, तसेच पारायणादरम्यान नाश्ता, चहा आणि पाण्याची व्यवस्था आयोजकांनी सेवेकऱ्यांमार्फत सुयोग्यरीत्या केली.
श्री संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj) विजय ग्रंथ पारायण सोहळ्यात एकवीस अध्यायांच्या वाचनानंतर भक्तिमय वातावरणात उपासनेची सांगता करण्यात आली. महाराजांच्या आरतीसह मंत्रपुष्पांजली, बावन्नी, अष्टक आणि एकवीस नमस्कारांचे सामूहिक पठण करण्यात आले. पारायण सोहळ्यानंतर उपस्थित सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सोहळ्यादरम्यान भक्तांनी अपार श्रद्धा व भक्तीभावाने सहभाग घेतला. उपासनेच्या प्रत्येक घटकाला भक्तांनी मोठ्या भावपूर्णतेने प्रतिसाद दिला. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप च्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.