भक्तराज महाराज राठोड यांनी दिली माहिती
मानोरा ( Banjara Samrudhi Yojana) : महाराष्ट्रात प्रथमच राज्य शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजना सुरू केली आहे. या योजनेचा मूळ उद्देश राज्यातील बंजारा लमाण तांडयांना महसूली दर्जा देवून ग्राम पंचायत निर्माण करणे आहे. त्यानंतर बंजारा लमाण तांडयांना (Banjara Samrudhi Yojana) मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तांडयांना दहा लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचा पहिला हप्ता वाशीम जिल्हयासाठी ५ कोटी ६० लाख रुपये उपलब्ध झाल्याची माहिती भाजपाचे युवा नेते भक्तराज महाराज राठोड (Bhaktaraj Maharaj Rathod) यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात ५५ तांड्याचा समावेश
ही (Banjara Samrudhi Yojana) योजना महाराष्ट्रासाठी नवीन आहे. वाशिम जिल्हयातील सहाही तालुक्यात बंजारा समाज बांधव वास्तव्यास आहे. जिल्हयातील वाशीम – ४, कारंजा -३ , मंगरुळपीर – ५ व मानोरा – ४३ असे एकूण ५५ गावांसाठी ५ कोटी ६० लक्ष रुपयाचा पहिला हप्ता शासनाने मंजूर केला आहे. वाशीम जिल्हयातील जास्तीत जास्त तांडयात ग्राम पंचायत निर्माण व्हावी, म्हणून जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय बैठका व तांडयाचा प्रवास अशासकीय सदस्यांनी केला असुन वेळोवेळी राज्य स्तरावर झालेल्या बैठकीत जिल्हयाला जास्तीत जास्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न केलेला आहे. सदरील विकास कामे ग्राम पंचायत मार्फत होणार असून ज्या – ज्या तांडा मध्ये निधी मंजूर झाला आहे. त्या ठिकाणच्या सरपंच सचिवांनी अंदाज पत्रक बनवून तांत्रिक मान्यता घेऊन लवकरात लवकर कामे सुरू करावीत, असे सर्व अशासकीय सदस्य प्रयत्न करीत आहेत.
येत्या काळात या (Banjara Samrudhi Yojana) योजने अंतर्गत जिल्हयातील तांडयांना केंद्र सरकारचा निधी येणार आहे. या योजनेत मूलभूत सुविधा पुरवून तांडयाचा विकास करण्यासाठी केंद्र शासनाने तांडा विकास बोर्ड स्थापन केलेला आहे. या योजनेला राज्याचा ३० टक्के आणि केंद्राचा ७० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील बंजारा तांडयांना पहिला हप्ता ५ कोटी ६० लक्ष रुपयाचा निधी मिळाल्याने येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारचा ७० टक्के निधी उपलब्ध होणार असुन विकासापासून वंचित असणाऱ्या बंजारा लमाण तांडयाचा विकास होणार आहे.
सर्वाधिक निधी मानोरा तालुक्याला
बहुल बंजारा असलेल्या मानोरा तालुक्याला जिल्हयातील ५५ पैकी ४३ तांडयाला १० लाख याप्रमाणे ४ कोटी ३० लक्ष रूपये मिळालेला आहे.