संतोष देशमुखांच्या आरोपींनी केलेल्या कृत्याचा तीव्र धिक्कार!
बुलढाणा (Santosh Deshmukh murder case) : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे गुन्हा करतानाचे विकृत फोटो व्हायरल झाल्यामुळे तमाम बुलढाणेकर सुन्न झालेत. डोळ्यात अश्रू आणि मनात संताप घेऊन शहरातील तमाम शिवभक्त व भीमभक्त, विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आज बुधवार ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता स्वयंस्फूर्तीने शिवस्मारकावर जमा झाले. आरोपींनी केलेल्या कृत्याचा तीव्र धिक्कार करत त्यांना तात्काळ शिक्षेची मागणी करून जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले.
मुख्यमंत्र्यांनीसाठी दिलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात बुलढाणाकरांच्या वतीने नमूद करण्यात आले आहे की, मस्साजोगचे सरपंच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) यांच्या क्रूर हत्तेप्रकरणी दोन तीन दिवसापासून सोशल मिडीयामध्ये व वर्तमानपत्रामध्ये क्रूर हत्या केल्याचे फोटो व्हायरल होत आहे. त्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे. म्हणून मारेकऱ्यांना त्वरीत फाशीची शिक्षा व्हावी.
संपूर्ण राज्याला काळीमा फासणारी अशी ही घटना आहे. एका गावाच्या सुशिक्षित सरपंचाची दिवसाढवळ्या गुंडांकडून हत्या केली जाते ही बाब महाराष्ट्राची कायदा व सुव्यवस्था किती खालच्या पातळीला गेली आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. हे राज्य कायद्याच आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आपण प्रकरणातील मुख्य सूत्रधार व मारेकरी यांना तात्काळ शासन करणे गरजेचे आहे.
या (Santosh Deshmukh murder case) प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा राजकीय वरदहस्ताखाली असल्याचे बोलले जाते. याबाबत प्रसार माध्यमातून मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यामुळे जनमानसामध्ये मोठा रोष वाढला आहे. अद्याप काही मारेकरी मोकाट असल्याने सर्व जनतेमध्ये तीव्र असंतोष असून फरार असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करावी अशी आहे. जनभावनेचा विचार करुन व मृतक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी शिवाय जनमानसामध्ये हे राज्य कायद्याचे आहे, ही प्रतिमा कायम राहावी यासाठी सूत्रधार,आरोपी व त्याच्या आकाला फाशीची शिक्षा करणे गरजेचे आहे.
तसेच परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेला संशयास्पद मृत्यू हीदेखील बाब पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे व दोषर्षीना कठोर शासन झाले पाहिजे. तसेच तथाकथित अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची आगऱ्याहून झालेली सुटका ही औरंगजेबाला लाच देऊन झालेली आहे.
अशी मुक्ताफळे उधळली व महाराजांच्या शीर्यावर शंका उपस्थित करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रमाणे तथाकथित डॉ. प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज हे खैबर खिंडीतून पळून गेले असा उल्लेख करुन शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न व शिवाजी महाराजांच्या प्रराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे (Santosh Deshmukh murder case) अशा प्रवृत्तीच्या लोकांवर देखील तात्काळ कठोर कारवाही करण्यात यावी.. अशीही मागणी शेवटी करण्यात आली आहे.