परभणी/पाथरी (Parbhani) :- मस्साजोगचे सरपंच स्व .संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court)खटला चालवून मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह इतर मागण्यांसाठी अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्या वतीने गुरुवार ६ मार्च रोजी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून यासंदर्भात प्रशासना मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंगळवार ४ मार्च रोजी एक निवेदन देण्यात आले आहे .
अखंड मराठा समाज पाथरी तालुक्याच्या वतीने प्रशासनास निवेदन
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येचे समाज माध्यमांमध्ये फोटो व्हायरल (Viral) झाल्यानंतर संपूर्ण राज्यसह पाथरी तालुक्यामध्ये आरोपी विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी सकाळी अखंड मराठा समाज पाथरी तालुका यांच्या वतीने प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली . या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे . या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी , अशी जनतेची मागणी आहे असे म्हणत या हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
हत्येप्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी
याशिवाय निवेदनात म्हटले आहे की, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार यांनी मुंबई येथे सातपुडा बंगल्यावर बैठक घेत ज्यांनी सहभाग नोंदवला यांच्यासह आरोपींना सहकार्य करणारे सर्व पोलीस त्यांनाही सहआरोपी करत पुरवणी आरोपत्रात त्यांची नावे घेत इतर आरोपींना तात्काळ अटक करून न्यायालयीन कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी अखंड मराठा समाज पाथरीच्या वतीने गुरुवार ६ मार्च रोजी पाथरी तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे .