चिखलीत सरनाईक,राजपुत कि कुणाला पाठींबा…रविकांत तुपकरांच्या भुमिकेकडे लक्ष
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Election) : रविकांत तुपकर यांची बुलढाणा अर्बन रेसीडीन्सी येथे प्रमुख कार्यकर्ते व शेतकऱ्यांची बैठक पार पडली. दरम्याण तुपकरांनी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मतदार संघामधील उमेदवारांना नामांकन अर्ज भरण्याच्या सुचना दिल्या त्यामधे चिखली मतदार संघामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून चळवळीत सक्रीय असलेले विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांना नामांकन अर्ज दाखल करण्याचे सुचना दिल्या होत्या.
दरम्याण चिखली मध्ये विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांनी (Chikhli Assembly Election) चिखली मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केले असून चिखलीत सरनाईक, राजपुत निवडणूक रींगणात उतरणार का आनखी कुणी अन्य उमेदवाराला तुपकरांची महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडी चिखलीत पाठींबा दर्शवीणार याचा निर्णय लवकरच होणार आहे.चिखली मतदार संघामधे लोकसभेला तुपकरांना ४५०००मतदान मिळाले होते. त्यामुळे तुपकरांच्या भुमिकेकडे लक्ष लागलेले आहे
सुचक शेतकऱ्यांनी वर्गणीतून भरली अनामत रक्कम…
विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांची शेतकऱ्यांशी नाळ जूळली आहे. उमेदवारी अर्ज भरतांना जी १० हजार रु अनामत रक्कम भरावी लागती या दोन्ही उमेदवारांची रक्कम सुचक शेतकऱ्यांनी वर्गणीकरुण भरली आहे.हे विशेष….




