सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन
अर्जुनी मोर (International Yoga Day) : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय (Saraswati Vidyalaya) अर्जुनी मोर येथे शालेय कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. तन, मन ,आत्मा , बुद्धी यांची सांगड घालणारा योग. भगवान पतंजली मुनींनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक ,मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली. भारतीय संस्कृतीत योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याच्या प्रयत्नातून 21 जून ला आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगात केला जातो.
दिनांक 21 जून ला दहाव्या (International Yoga Day) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (Saraswati Vidyalaya) अर्जुनी मोर या ठिकाणी योग दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 5.45ते 7.00 या वेळेत करण्यात आले प्रशिक्षणानंतर, आपण आपले आरोग्य सुदृढ व निरामय बनवू शकतो, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे शाळेचे प्राचार्य आदरणीय जे. डी. पठाण सर यांनी केले व योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन लीना ढोमने हिने केले तसेच विद्यालयातील (Saraswati Vidyalaya) जिल्हा विभाग व राज्यस्तरावरील कु.रिया नाकाडे , माही नाकाडे, आशुतोष गहाने, निकुंज हेमणे, अस्मिता हातझाडे, श्रावणी वंजारी यांनी योगासनाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे योग दिन मार्गदर्शन विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका माधुरी पिलारे यांनी केले व आभार कु.लीना ढोमणे हिने केले. या (International Yoga Day) कार्यक्रमाला प्रामुख्याने आदरणीय सौ. घाटे मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय पालीवाल सर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संकल्प घेऊन शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.