आष्टी (Wardha) :- आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मुधोली रिठ येथील विद्यमान सरपंचाने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ५ मे रोजी सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली . मंगलदास आत्राम ( ४०)रा. मुधोली रिठ ता. चामोर्शी असे मृतक सरपंचाचे नाव आहे.
मृतक मंगलदास हा सकाळच्या सुमारास घराबाहेर पडला. मुधोली चक. नं दोन च्या मेश्राम नामक शेतकर्याच्या शेतशिवारातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह (Dead body)आढळला. याची माहिती होताच गावातील नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. घटनेची माहिती आष्टी पोलिसांना कळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु असुन त्याच्या आत्महत्येचे (Suicide) नेमके कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.