नवेगावबांध येथील प्रकार
नवेगावबांध (Gram Sabha) : स्थानिक ग्राम पंचायतीचा कारभार तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. २१ ऑगस्ट रोजी ग्रामसभा (Gram Sabha) आयोजित करण्यात आली होती. परंतु, या ग्रामसभेकडे सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्यांसह गावकर्यांनीही पाठ फिरवली. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या कार्यप्रणालीवर नागरिकांना विश्वास राहिला नाही, अशीच चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, जवळपास १८ पदाधिकार्यांनी सभेत अनुपस्थित दर्शविली.
एकमेव सदस्याची उपस्थिती चर्चेचा विषय
नवेगावबांध ग्राम पंचायतीचा कारभार, ग्रामसभांचे आयोजन नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा ग्रामसभा (Gram Sabha) आयोजित करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा ही सर्व प्रकारच्या उपलब्ध निधी व चालू वर्षात करावयाच्या कामाच्या नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक असते. परंतु, ग्रामसभेचे अध्यक्ष असलेले सरपंच, उपसरपंच यांच्यासह १८ सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवून अनुपस्थित राहिले. त्याचबरोबर नागरिकही ग्रामसभेकडे फिरकले नाही. त्यामुळे गावकर्यांच्या ग्राम पंचायतीच्या कार्यप्रणालीवर विश्वासच राहिला नाही, अशी कुजबूज परिसरात सुरू झाली आहे.
उल्लेखनीय असे की, नवेगावबांध येथील ग्रामसभा (Gram Sabha) कोणत्या न कोणत्या कारणावरून नियमीत तहकूब होते. त्यामुळेच की काय ग्रामसभेचे सदस्य असलेले महिला-पुरुष नागरिकच ग्रामसभेकडे पाठ फिरवितांना दिसून येतात. हा गेल्या दोन-तीन वर्षापासून आजपर्यंतचा अनुभव आहे. आताही त्याच प्रकाराची पुर्नरावृत्ती झाली आहे. या महत्वपूर्ण सभेला घेवून सभेचे अध्यक्ष दस्तुरखुद सरपंच तसेच उपसरपंचासह १७ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभेला दांडी मारली. यावरून ग्रामपंचायतचे पदाधिकारी किती जबाबदार आहेत? हे दिसून आले. या प्रकाराला घेवून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना दिसून येत आहे.
तहकूब सभा ३० ऑगस्टला
आयोजित असलेल्या (Gram Sabha) ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व सदस्य अशा १८ पदाधिकार्यांसह गावकर्यानीही पाठ फिरविल्याने सभा तहकूब करण्यात आली. दरम्यान तहकूब सभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. परंतु, ग्रा.पं.चे पदाधिकारी हजर नसताना ग्रामसेवकाने कोणच्या परवानगीने तहकूब केली? ग्रामसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या गैरहजेरीत तहकूब सभा ३० ऑगस्टला कोणत्या नियम व अधिकारात ठेवली आहे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
फक्त एक सदस्यांची उपस्थिती
आयोजित ग्रामसभेची वेळ होऊन सभेत सरपंच, उपसरपंच व सदस्यांने दांडी मारले. यावेळी फक्त एकमेव सदस्य रेशीम काशिवार हेच उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनाच ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनाच घोषित करण्यात आले. तर तंमुस अध्यक्ष हरिश्चंद्र चांदेवार, मुलचंद गुप्ता, प्रेमलाल लांजेवार व ग्रामविकास अधिकारी रामटेके व ग्रामपंचायतचे कर्मचारी असे बोटावर मोजण्याएवढेच मंडळी ग्रामसभेला उपस्थित होते.
सरपंच संघटनेचा संप होता. त्यामुळे आपण सदर (Gram Sabha) ग्रामसभेला उपस्थित राहू शकलो नाही.
– हिराबाई पंधरे, सरपंच नवेगावबांध
गाव विकासासाठी ग्रामसभेला (Gram Sabha) महत्व आहे. सभेत मतदारांच्या १५ टक्के नागरिकांची उपस्थिती अनिवार्य असते. परंतु , तेवढी उपस्थिती नसल्याने कोरम अभावी सभा तहकूब करून नियमाप्रमाणे ३० ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
– व्ही.ई.रामटेके, ग्राविअ नवेगावबांध.
अध्यक्ष असलेल्या सरपंचाच्या सहीने ग्रामसभेची (Gram Sabha) नोटीस काढण्यात आली. सर्व सभासदांना नोटीस देण्यात आल, मुनादीही करण्यात आली. असे असताना पदाधिकारी व सदस्य का गैरहजर राहिले? हे एक कोडेच आहे.
-रेशीम काशीवार, सदस्य ग्रा.पं. नवेगावबांध