व्हिसा नियम कडक करण्याचे आदेश
नवी दिल्ली (Saudi Arabia Visa) : सौदी सरकारने बांगलादेश, पाकिस्तान आणि (India) भारतासह 14 देशांमधील लोकांसाठी काही (Saudi Arabia Visa) व्हिसा निलंबित करून नवीन प्रवास निर्बंध लादले आहेत. हज यात्रेदरम्यान गर्दी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. माहितीनुसार, ही बंदी जूनच्या मध्यापर्यंत, (Hajj Yatra) हज यात्रा संपेपर्यंत लागू राहील.
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, (Umrah Visa) उमराह व्हिसा, बिझनेस व्हिजिट व्हिसा आणि (Saudi Arabia Visa) फॅमिली व्हिजिट व्हिसा निलंबित करण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांतील हज यात्रेकरूंसाठी हा निर्णय निराशाजनक आहे, जिथे दरवर्षी हजारो लोक पवित्र (Hajj Yatra) हज यात्रेसाठी जातात.
सौदी अरेबियाने व्हिसावर निर्बंध का लादले?
योग्य नोंदणीशिवाय हज यात्रा (Saudi Arabia Visa) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सौदी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक परदेशी नागरिक उमराह किंवा (Family Visit Visa) व्हिजिट व्हिसावर सौदी अरेबियात येतात आणि बेकायदेशीरपणे राहतात आणि नंतर हज करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गर्दी वाढते आणि नोंदणी केलेल्या हज यात्रेकरूंना अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या वर्षी गर्दी आणि उष्णतेमुळे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हे लक्षात घेऊन हा (Hajj Yatra) निर्णय घेण्यात आला आहे.
व्हिसा बंदी कधी सुरू होणार?
माहितीनुसार, 13 एप्रिलपर्यंत परदेशी नागरिकांना व्हिजिट व्हिसा (Saudi Arabia Visa) किंवा उमराह व्हिसा जारी केला जाईल. त्यानंतर, सूचीबद्ध 14 देशांच्या नागरिकांना कोणताही नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही. हज यात्रा सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावी, यासाठी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (Mohammed bin Salman) यांनी व्हिसा नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत.