हिंगोली(Hingoli):- स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेत डॉ.निरज देव (जळगाव) यांनी प्रथम पुष्प गुंफले. या व्याख्यानात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्रावर(Biography) विचार मांडले.
डॉ.निरज देव यांनी व्याख्यानात मांडले विचार
२६ मे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर व्याख्यानमालाच्या पहिल्या पुष्पा मध्ये डॉ.नीरज देव (जळगाव) यांनी माफी वीर ? तरी मान्यच! या विषयाच्या अनुषंगाने अभ्यास पूर्ण व पुराव्यासह मांडणी केली. वि रा. सावरकर यांच्या माफीनामा प्रकरणास ११३ वर्ष पूर्ण होत आहे तरी आजही अनेक भ्रामक कल्पना, विचार त्यासंबंधी आहे माफीनामा या शब्दाची उत्तम पद्धतीने फोड करून त्याचे नेमके स्वरूप कसे असते याविषयी भूमिका मांडून सावरकरांनी हा मार्ग पत्करला ही काळाची गरज होती का? या विचाराला वाचा फोडण्याचे उत्तम कार्य डॉ.देव यांनी केले.
आयुष्य निकामी करण्यासाठी जन्मठेप दिली जाते
उमेदीचे आयुष्य निकामी करण्यासाठी जन्मठेप (life imprisonment) दिली जाते तसेच तिचा कालावधी पंचवीस वर्षे इतका होता परंतु सावरकर हे एकमेव क्रांतीकारक आहेत की ज्यांना सलग दोन जन्मठेप शिक्षा बहाल करण्यात आल्या ,असे भारत वर्षातील एकमेव उदाहरण होय. अकरा वर्ष अंदमान जेल येथे शिक्षा भोगली. चौफेर सावरकर उकलुन दाखवत त्यांच्या कार्याची महती मांडली. तत्कालीन समाज सुधारक, तत्त्वज्ञानी(philosopher) यांनी सावरकरा विषयी मांडलेल्या भावना प्रस्तुत करण्याचे कार्य केले. कार्यक्रमास आर्थिक योगदान करणारे तसेच आमंत्रित वक्ते, प्रमुख पाहुणे, श्रोतावर्ग, गीत सादर करणारे सर्वांचे स्वा सावरकर मित्र मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन, आभार प्रदर्शन महेश पेंडके ह्यांनी आपल्या भारदस्त शैलीतून केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प
दरम्यान प्रारंभी स्वा.सावरकर ह्यांचे जयोस्तुते.. जयोस्तुते..गीत सौ.संस्कृती जामकर, कु.सायली शेखर देशमुख. ह्यांनी खूप छान सादर केले हार्मोनियम साथ श्री गजानन रत्नपारखी, श्री निकेश यरमळ तबलासाथ मंगेश पांडे व प्रथम कुलकर्णी तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक एम.डी.जोशी व स्नेहविकास कॉलनी श्री दत्त मंदिर समितीचे हेमंत कुलकर्णी, ह्या दरम्यान प्रमुख वक्ते डॉ नीरज देव यांचा सत्कार स्वा. सावरकर मित्र मंडळाचे गणेश पहिनकर यांनी केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ .सतीश विडोळकर ह्यांचा सत्कार डॉ. कुमार भालेराव ह्यांनी केला. कार्यक्रमाचे प्रायोजक एम.डी. जोशी व श्री दत्त मंदिर समितीचे हेमंत कुलकर्णी ह्यांचा सत्कार शैलेश नांदेडकर ह्यांनी केला.