पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे मजीप्राचे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
भातकुली (save Water) : विश्रोळी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १०५ गावे प्रादेशिक ग्रामिण पाणी पुरवठा (Water supply) योजनेतील पूर्णानगर ते मार्किदरम्यान वायगाव फाट्याजवळ गळती व दुरुस्ती चे काम करण्यात येणार असल्याने तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सर्व गावांचा पाणीपुरवठा दिनांक ६ व ७ मे ला बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन (Water Management) उपविभाग क्र.२, अमरावतीचे उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे.
पाईप लाईन गळती व दुरुस्तीचे काम
१०५ गांवे प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा (Water supply) योजनेतील भातकुली तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सुमारे ऐंशी गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. खारपानपट्टा असलेल्या या भागात विश्रोळी पाणीपुरवठा योजनेमुळे मोठी सोय झाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत नाही, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या योजनेची पूर्णानगर जवळील मुख्य गुरुत्ववाहिणीवरील पाईप लाईनचे गळती व दुरुस्तीचे काम करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने दिनांक ६ व ७ मे ला युध्द स्तरावर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील मार्कि, आष्टी, धामोरी, निरुळ, भातकुली व सायत झोनमधील सर्व गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाण्याचा साठा करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन उपविभाग क्र.२, अमरावतीचे उपविभागीय अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे.
भातकुली शहराला तब्बल पाच दिवसांनी पाणी पुरवठा होणार!
विश्रोळी पाणी पुरवठा (Water supply) योजनेअंतर्गत भातकुली शहराला तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येतो. शुक्रवारला (ता.३) पाणीपुरवठा करण्यात आला. दिनांक ६ व ७ एप्रिलला लिकेंजचे काम होणार असल्याने पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे तब्बल पाच दिवसांनी शहराला पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाच दिवसापर्यंत नागरिकांच्या घरातील भांड्यात पाणी राहील का असा प्रश्न नागरिकांत उपस्थित केला जात आहे.
शहरात पाण्याचे स्रोत नाही…
विश्रोळी पाणीपुरवठा (Water supply) योजनेअंतर्गत भातकुली तालुक्यातील सुमारे ऐंशी गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे भातकुली शहरासह ग्रामिण भागातील पाण्याची समस्या निकाली निघाली होती. दरम्यान, गेल्या एक- दोन वर्षांपासून नियमित पाणी पुरवठा (Water supply) होत नसल्याने भातकुली परिसरातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भातकुली शहरात विहिरी बुजल्या, हातपंप नादुरुस्त आहे. अशा गंभीर परिस्थितीत पाण्याचे इतर स्त्रोत नाही त्यामुळे पाणी कोठून आणावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा असतो.