वसमत (save water) : वसमत शहराला पाणीपुरवठा (Water supply) करणारी पाईपलाईन (Pipeline) नागेशवाडी पाटीजवळ फुटली होती. तिचे दुरुस्तीचे काम होऊन एकच दिवस झाला. शहराला पाणीपुरवठा सुरळीत झाला होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी दगडगाव रस्त्यावर पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.
वसमतची पाईपलाईन पुन्हा फुटली
वसमत शहराला सिद्धेश्वर धरणावरून (Pipeline) पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा (Water supply) करणारी योजना आहे. या योजनेत वारंवार अनेक अडचणी येत आहेत. कधी वीज पुरवठ्याची अडचण तर कधी पाईपलाईन फुटण्याची समस्या उभी राहत आहे. त्यामुळे वसमत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. चार दिवसापूर्वी नागेशवाडीपाटी जवळ पुलाचे खोदकाम करताना पाईपलाईन फुटली होती. पाईपलाईन दुरुस्तीचे काम शुक्रवारी पूर्ण झाले होते. शुक्रवारपासून शहराचा (Water supply) पाणीपुरवठा सुरळीत झाला होता.
भर उन्हात दुरुस्तीचे काम
मात्र शनिवारी दुपारनंतर वसमत दगडगाव रस्त्यावर (Pipeline) पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे पुन्हा वसमतचा (Water supply) पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वारंवार पाईपलाईन फुटल्याने भर उन्हात दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. दुसरीकडे वसमतकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. दगडगाव रस्त्यावर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने भेट देऊन पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे (Vasmat mnp) नगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.