सोनपेठ(Parbhani) :- तुम्ही चोर आहात, तुम्ही मोटारी चोरण्यासाठी आला होतात, असे म्हणत पाच जणांना जबर मारहाण करत जखमी करण्यात आले. जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. ही घटना २२ जून रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील सायखेडा शिवारात घडली. या प्रकरणी २३ जून रोजी सोनपेठ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अॅक्ट(Atrocities Act) व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण करणार्यांनी त्यांच्याजवळ वायर आणून टाकले
फिर्यादी हे बाबाराव जाधव, राहूल जाधव, अजय जाधव यांच्या सोबत दुचाकीने नरवाडी शिवारात बटईने केलेल्या शेताकडे (Farm)गेले होते. परत येताना सायखेडा शिवारात दुचाकीवर काही जण आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेल्यांना तुम्ही चोर आहात, तुम्ही मोटारी चोरण्यासाठी आला आहात, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ(abuse) करत जबर मारहाण(beating) केली. फिर्यादीने आम्ही चोर नाहीत, असे म्हणाल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करणार्यांनी त्यांच्याजवळ वायर आणून टाकले. या प्रकरणी अमोल कदम, नितीन नागवडे, हनुमान कदम, शुभम कदम, ऋषिकेश कदम, संतोष कदम, पृथ्वीराज कदम, अक्षय होरगुळे, साहेश्वर लोंढे, सुदर्शन कदम, गंगाधर कदम यांच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत.