छत्रपती संभाजीनगर (SBI ATM Robbery) : क्रांतीचौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि पोलिस कॉलनीसमोरच असलेल्या विवेकानंद कॉलेज जवळील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यानी ८ लाख ८९ हजाराची रोकड लांबवली. १ डिसेंबरला पहाटे साडेतीन वाजेनंतर समर्थनगर रोडवर हा प्रकार घडला. या (SBI ATM Robbery) प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या (SBI ATM Robbery) प्रकरणी विकास हुकुमचंद निकाळजे (वय ४० रा. तिरुपती पार्क, गुरुसहाणीनगर, एन ४. सिडको) यांनी तक्रार दाखल केली. निकाळजे हे एसबीआय बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात डेप्युटी मॅनेजर म्हणुन तसेच एटीएम मॅनेजर म्हणुन काम करतात. १ डिसेंबरला दुपारी दोन वाजता निकाळजे यांना एटीएममध्ये कॅश भरणारी ऐजसीच्या प्रतिनिधीचा कॉल आला. त्यांनी विवेकानंद कॉलेजच्या गेटला लागून असलेल्या एटीएम मशीनचा दरवाजा जळालेला असून पुर्ण उघडा आहे.
आतमधील कॅसेट आणि रोख रक्कम देखील दिसून येत नसल्याची माहिती दिली. या माहितीनंतर निकाळजे यांनी वरिष्ठांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी पाहणी केली असता त्यांना कॅमेर्यावर स्प्रे मारल्याचे दिसून आले. चोरट्यांनी यावेळी मशीनमधील ८ लाख ८९ हजाराची रक्कम लांबवल्याचे लक्षात आले. या (SBI ATM Robbery) प्रकरणी निकाळजे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुनिल माने तपास करीत आहेत.