हिंगोली (Jaleshwar lake Flood) : जलेश्वर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. तलावातील गाळ उपसा उन्हाळ्यात काढण्यात आला आहे. तलावा लगत रस्त्याचे काम केले जात आहे. गवळीपुरा भागातील जीवन कला मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात पावसाचे व तलावाचे पाणी मुरून भिंतीला मोठे तडे गेले आहेत.
१ सप्टेंबरला सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. हिंगोली गवळीपुरा भागातील जीवन कला मंदिराच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे पडले असून भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. जलेश्वर तलावाचे सुशोभिकर व रस्त्याचे काम या ठिकाणी सुरू आहे.( Jaleshwar lake Flood) रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून मुसळधार पाऊस व तलावाचे पाणी मुरल्यामुळे या भिंतीला तडे जाऊन मंदिराखालील सभागृहात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी भाविकांतून केली जात आहे.