डॉ. टी. सी राठोड यांची पत्रकार परिषद
सोमवारी काढणार जनआक्रोश मोर्चा
यवतमाळ (Banjara Samaj Reservation) : महाराष्ट्रातील बंजारा जमातींचा अनुसुचित जमाती (एस टी) यादीत समावेश करावा, अशी मागणी घेऊन सोमवारी, ६ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज, ३ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.टी.सी. राठोड यांनी दिली. ही मागणी मान्य न झाल्यास भविष्यात आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याची ते म्हणाले.
महाराष्ट्रातील बंजारा जमातींचा (Banjara Samaj Reservation) अनुसुचित जमाती (एस टी) यादीत समावेश करण्या बाबत अनेक दशकानुदशके प्रश्न प्रलंबित आहे. या समाजाला आजवर संविधानिक हक्क व आरक्षणाच्या सवलती मिळालेल्या नाहीत. परिणागी हा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात मागे राहिला आहे. आजही बहुसंख्य बंजारा बांधव तांडा पद्धतीत मूलभूत सुविधां शिवाय व विषण्ण अवस्थेत जीवन जगत आहेत. म्हणून या जमातींना न्याय देण्यासाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी समाजातील सर्व स्तरांतून होत आहे.
महाराष्ट्रातील बंजारा समाज (Banjara Samaj Reservation) इतर राज्यांप्रमाणे आजवर संविधानिक सवलतींना मुकला आहे. तांड्यांमध्ये मध्ये मूलभूत सुविधा नसल्याने मोठ्?या प्रमाणात शहरी भागाकडे स्थलांतर होत असून, पारंपरिक तांडा संस्कृती धोक्यात आली असल्याची माहिती डॉ.टी.सी. राठोड यांनी शुक्रवार ३ आक्टोंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मोहन राठोड, भारत राठोड, किशोर पालथीया, श्रावण पवार, प्रा. प्रवीण पवार, यांच्यासह अनेक समाज बांध समाज बांधव उपस्थित होते.
तसेच हैदराबाद गॅझेटिअर व सी.पी. अॅन्ड बेरार गॅझेट नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणास बाधा न आणता स्वतंत्र अनुसूचित जमाती (ब) सूची तयार करून, बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने सोमवारी ६ आक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता यवतमाळ आर्णी रोड येथील वनवासी मारोती ते पोस्टल ग्राउंड येथे (Banjara Samaj Reservation) बंजारा समाजाचा विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. या मोर्चात बंजारा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.
